‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात गडचिरोली येथे निवेदने

निवासी जिल्हाधिकारी संपत खलाटे, शिक्षणाधिकारी उंचे, तसेच गडचिरोली पोलीस ठाणे येथे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.

श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने माटुंगा येथे आज भव्य मातृ-पितृ पूजन कार्यक्रम !

श्री योग वेदांत सेवा समिती आणि युवा सेवा संघ यांच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी माटुंगा येथील मध्य रेल्वे कॉलनी येथील आर्.पी.एफ्. रेल्वे ग्राऊंडवर दुपारी ४ वाजता भव्य मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोरेगाव (पूर्व) येथील पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांच्या आश्रमाच्या येथून दुचाकी…

(म्हणे) ‘प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र उद्यान बनवा !’

प्रेमीयुगुलांना प्रेमाच्या गोष्टी करण्यासाठी सुरक्षित सार्वजनिक ठिकाण नाही. सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसणार्‍या प्रेमीयुगुलांना समाजाच्या नैतिक देखरेखीचा आणि छळाचा सामना करावा लागतो, असा कांगावा करत ‘राईट टू लव्ह’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ‘शहरात प्रेमीयुगुलांसाठी एक स्वतंत्र उद्यान असावे’, अशी मागणी केली आहे.

तुळजापूर येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी धर्मप्रेमींचे पोलिसांना निवेदन !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालयांत ‘मातृ-पितृ पूजनदिन’ म्हणून साजरा करण्यास प्रोत्साहन द्या, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने अनेक धर्मप्रेमींनी येथील पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

वर्धा येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीचे प्रशासनाला निवेदन

‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली शाळा-महाविद्यालये यांच्या परिसरात होणारे अपप्रकार रोखण्यात यावेत, तसेच १४ फेब्रुवारी हा दिवस शाळा-महाविद्यालये यांमध्ये मातृ-पितृृ पूजनदिन म्हणून साजरा करावा याविषयी मुख्याध्यापक तथा प्राचार्य यांना प्रोत्साहन देण्यात यावे…..

‘व्हॅलेंटाईन डे’ या पाश्‍चात्त्य कुप्रथेच्या विरोधात प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना सूचना !

युवकांनो, ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारा ! – मकरंद अनासपुरे

‘व्हॅलेंटाईन डे’ हा आपला नसून पाश्‍चिमात्यांचा आहे. युवकांनी ‘व्हॅलेंटाईन डे’ला नाकारून भारतीय संस्कृतीमधील विविध सण-उत्सवांचे दिवस आनंदाने साजरे करावेत, असे आवाहन अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी येथील एका कार्यक्रमात केले.

राजस्थान सरकार ‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून आयोजित करणार

राजस्थानमधील भाजप सरकारने १४ फेब्रुवारी हा दिवस ‘मातृ-पितृ पूजन’ दिवस म्हणून आयोजित करण्याचा आदेश दिला आहे. सरकारने २३ एप्रिलला या संदर्भातील परिपत्रक काढले आहे.

‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणजे युवकांमध्ये विकृती निर्माण करून संस्कृतीचा र्‍हास करणारी कुप्रथा ! – प्रकाश मालोंडकर

गुरु-शिष्य, पिता-पुत्र, बहीण-भाऊ, पती-पत्नी अशा अनेक पवित्र नात्यांचे संस्कार जपणार्‍या भारतीय संस्कृतीमध्ये आज पाश्‍चात्त्य विकृत परंपरा फोफावत आहेत.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी धर्मांधाकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

इयत्ता बारावीत शिकणार्‍या अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून जुनैद याने व्हलेंटाईन डेला फिरवून आणण्याच्या निमित्ताने तिचे अपहरण केले.


Multi Language |Offline reading | PDF