आंदोलनाला वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना धक्काबुक्की

येथील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर काही महिला अधिवक्त्यांनी ८ नोव्हेंबर या दिवशी पू. संभाजी भिडेगुरुजींच्या विरोधात हातात फलक घेऊन घोषणा देत आंदोलन केले.

‘हलाल’ला झटका !

देशात जेथे जेथे अशा परिषदा होतील, तेथे वैध मार्गांनी विरोध केला पाहिजे. हा कार्यक्रम रहित झाला, म्हणजे सगळे संपले असे नाही, जोपर्यंत भारतात हलालचे प्रमाणीकरण करणारी व्यवस्था निरस्त होत नाही, तोपर्यंत हा लढा चालूच राहिला पाहिजे. आवश्यकता आहे ती आपण सर्वांनी कृतीशील होण्याची !

संभाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी मनसेच्या वतीने आंदोलन !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ९ नोव्हेंबर या दिवशी येथील  शिवाजीनगरच्या भुयारी मार्गासाठी आंदोलन करण्यात आले. सरकारने त्वरित पूर्ण निधी संमत करून भुयारी मार्ग सिद्ध करून द्यावा; अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी मनसेच्या वतीने या वेळी देण्यात आली.

केरळच्या मुसलमान महिलांनी हिजाब जाळून इराण सरकारचा केला निषेध !

कर्नाटकात या वर्षाच्या आरंभी झालेल्या हिजाब वादावरून मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास समर्थन देणारी पुरो(अधो)गामी टोळी इराणमध्ये गेल्या दीड मासापासून चालू असलेल्या तेथील सरकारच्या विरोधातील आंदोलनावरून तेथील सरकारला पाठिंबा देत नाही, हे जाणा !

हलाल अर्थव्यवस्थेला संघटितपणे विरोध करा ! – दुर्गेश परुळकर, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण केली जात आहे. १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे होणार्‍या ‘हलाल शो इंडिया’च्या विरोधात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन याला विरोध करा.

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात घायाळ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान सध्या पाकमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहेत. वझिराबाद येथे मोर्च्याच्या वेळी एका तरुणाने पिस्तूलमधून इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला. या वेळी इम्रान खान कंटेनर ट्रकवर उभे होते.

सिंधुदुर्ग – तोरसोळे येथील अनधिकृत खाण व्यवसाय बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

असंवेदनशील प्रशासनाला कधी तक्रारीची भाषाच समजत नाही. उपोषण, आंदोलन, रस्ता बंद यांचीच भाषा समजते किंबहुना या भाषेची सवयच झाली आहे. जाधव यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून कारवाई केली, तरच असे अवैध प्रकार थांबतील !

हिंदूंची संपत्ती हडपण्याचे अमर्याद अधिकार मिळालेला ‘वक्फ कायदा’ रहित करा ! – चंदगड येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदूंची एकमुखी मागणी

देशभरात वक्फ कायद्याच्या दुरुपयोगाने चालू असलेला ‘लँड जिहाद’च आहे. हा धार्मिक भेदाभेद करणारा, राज्यघटनाविरोधी काळा कायदा त्वरित रहित करण्यात यावा, या मागणीसाठी चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ३१ ऑक्टोबरला हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन !

महाराष्ट्रातील प्रकल्प अन्य राज्यांत जात असल्याचे प्रकरण !

सरकारने शिवप्रतापाची जागा शिवप्रतापदिनापूर्वी खुली न केल्यास शिवभक्त ती खुली करतील ! – नितीन शिंदे

अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाच्या विरोधात शिवभक्तांची ‘मागणी परिषद’