काँग्रेसच्या दुटप्पी धोरणामुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न गेली ६६ वर्षे प्रलंबित ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या प्रश्नामुळे कधीही घराबाहेर न पडणारे रस्त्यावर आले आणि रस्त्यावरून पायरीवर आले ! राज्याच्या विरोधात ठराव करण्याची वृत्ती हे कशाचे द्योतक आहे ?

सरकारच्या विरोधात विरोधकांचे आंदोलन !

या वेळी विरोधकांनी हातात एक एक संत्रे घेतले होते. या वेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘त्यागपत्र द्या त्यागपत्र द्या, अब्दुल सत्तार त्यागपत्र द्या’, ‘शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी’, ‘धानाला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘कापूस, संत्रे, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन या पिकांना भाव मिळालाच पाहिजे’, या अशा घोषणा दिल्या.

आंदोलन करतांना टाळ-मृदुंग घेत विरोधकांकडून विठ्ठल आणि वारकरी संप्रदाय यांचा अवमान !

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या भूमी घोटाळ्यावर अभंगाच्या स्वरूपात रचना करून तसे अभंग म्हणणे कितपत योग्य आहे ?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दाऊदशी संबंध ठेवणार्‍या युवासेना पदाधिकार्‍याच्या विरोधात आंदोलन !

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून एका महिलेवर अत्याचार झाल्याचा आरोप करत २ दिवसांपूर्वी विधान परिषदेत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा ! – महाविकास आघाडीच्या आमदारांची मागणी

विरोधी पक्षनेते अजित पवार अन् विधान परिषदेत अनिल परब यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर भूमी घोटाळ्याचे आरोप ! ‘या प्रकरणी सत्तार यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी महाविकास आघाडीने करून विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

हिंदु समाज हा एकसंध राहिला पाहिजे. मंदिराचे सरकारीकरण आणि बळजोरीने होऊ घातलेला ‘कॉरिडॉर’ दोन्ही गोष्टी अन्यायकारक आहेत.

धर्मावरील आघातांविरुद्ध सांगलीत १० सहस्र हिंदूंची सिंहगर्जना !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या, हिंदु देवता आणि संत यांचे विडंबन अन् सामाजिक तेढ यांच्या विरोधात कठोर कायदा करण्याच्या मागणीसाठी सांगलीत २४ डिसेंबरला भव्य ‘हिंदु गर्जना मोर्चा’ काढण्यात आला.

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक ! – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास कचरतात.

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

‘पठाण’ चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन यांवर बंदी घाला !

समस्त हिंदुत्ववादी संघटनांची तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !