ओवैसी यांनी लिहून दिल्यास रोहिग्यांना बाहेर हाकलू ! – अमित शहा यांचे प्रत्युत्तर

‘जर हैद्राबादमध्ये अवैधरित्या बांगलादेशी आणि रोहिंग्या रहात आहेत, तर अमित शहा कारवाई का करत नाही ?’, असा प्रश्‍न ओवैसी यांनी विचारला होता. त्याला शहा यांनी उत्तर दिले.

३० सहस्र रोहिंग्यांची मतदार सूचीमध्ये नोंद होईपर्यंत अमित शहा झोपा काढत होते का ? – असदुद्दीन ओवैसी यांचे तेजस्वी सूर्या यांना प्रत्युत्तर

जर तुम्ही ३० सहस्र रोहिंग्यांची मतदारसूचीत नोंद असल्याचे सांगत आहात, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एवढे सगळे होईपर्यंत झोपा काढत होते का ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांच्या टीकेवर केला आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतातील कट्टरतावादाच्या तपासणीच्या अभ्यासाला मान्यता यू.ए.पी.ए. कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचीही सूचना

हा अभ्यास जम्मू-काश्मीर, आसाम, महाराष्ट्र आणि केरळ अशा ४ राज्यांत केला जाईल. या राज्यात कट्टरतावादाची बहुसंख्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

काश्मीरमध्ये मारले गेलेले आतंकवादी २६/११ सारखे आक्रमण करण्याच्या सिद्धतेत होते !

आज १२ वर्षांनंतरही आतंकवादी पुन्हा असेच आक्रमण करण्याची सिद्धता करतात, हे पहाता भारताने गेल्या १२ वर्षांत देशातील जिहादी आतंकवाद नष्ट केलेला नाही, त्यासाठी त्याचा निर्माता असलेल्या पाकला नष्ट करण्याचे धाडस भारताने आता दाखवायला हवे !