उपचार विनामूल्य असूनही ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तील लाभार्थ्यांकडून काही रुग्णालयांनी १५ कोटी रुपये उकळले !

लाभार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा पाठवल्यानंतर त्यांच्यावर कोणती कारवाई केली, याची माहिती मिळत नाही. पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर परवाना रहित करण्यासमवेत फौजदारी कारवाई केल्यास भविष्यात असे प्रकार पुन्हा होणार नाहीत !

वाई (जिल्हा सातारा) येथील नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे ! – शिवसेना

वाई शहरातील किसन वीर ते सोनगीरवाडी यांना जोडणाऱ्या नवीन पुलाला ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव द्यावे, अशी मागणी वाई शिवसेनेच्या वतीने नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

पुणे महापालिकेच्या अयोग्य वापर होणाऱ्या वास्तूंची पडताळणी होणार !

केवळ वापर होत आहे किंवा विनावापर आहेत, याची पडताळणी करून काय होणार ? त्या वास्तूंचा अयोग्य पद्धतीने, म्हणजे गैरवापर होत असल्याची पडताळणी होणे आवश्यक आहे…

अग्नीपथ भरती योजना म्हणजे तरुणांना सैन्यदलात काम करण्याची सुवर्णसंधी !

‘अग्नीपथ भरती योजने’च्या माध्यमातून देशातील ४६ सहस्र तरुणांना भारतीय सैन्यात भरती करण्यात येणार आहे. ‘देशाची सुरक्षा सबळ करणे आणि देशातील युवकांना सैन्यात भरती करणे, यांसाठी ही योजना चालू करण्यात येत आहे’

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधातील हिंसाचारामुळे रेल्वेची ७०० कोटी रुपयांची हानी

केवळ रेल्वे प्रशासनाचीच इतकी हानी झाली असेल, तर अन्य सार्वजनिक संपत्तीची किती हानी झाली असेल, याची कल्पना करता येत नाही. याला उत्तरदायी असणार्‍यांना पकडून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

१ जुलैपासून ‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या वस्तू वापरल्यास कारवाई होणार !

जनहिताचे नियम करणे एकांगी असून त्यांची कठोर कार्यवाही आणि कायद्याचे प्रामाणिकपणे पालन करणारी जनता निर्माण होणे आवश्यक आहे. असे आतापर्यंत होऊ न शकणे, हे लोकशाहीचे अपयश नव्हे का ?

वारकर्‍यांसाठीच्या ‘पंढरीची वारी’ या ‘ॲप’चे २१ जून या दिवशी होणार लोकार्पण !

वारकर्‍यांना गर्दीच्या काळात साहाय्य व्हावे यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने प्रथमच ‘पंढरीची वारी’ हे भ्रमणभाषवरील ‘अ‍ॅप’ सिद्ध केले आहे. त्यावर वारीच्या काळात प्रशासनाकडून सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर येथे येणारे वारकरी यांना पुरवण्यात येणार्‍या सुविधांची माहिती मिळेल.

रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणार्‍यांना आता १ सहस्र रुपये दंड

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम आहे !

‘अग्नीपथ’ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये ४ रेल्वे गाड्या जाळल्या !

‘अग्निपथ’ योजनेला बिहारमध्ये चालू झालेला हा विरोध आता हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पसरला आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाची ‘५ जी स्पेक्ट्रम’च्या (ध्वनीलहरींच्या) लिलावाला संमती

जुलै मासाच्या शेवटपर्यंत हा लिलाव होणार असून संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ ‘मेगाहर्ट्झ’ स्पेक्ट्रमसाठी असतील, असे सरकारने स्पष्ट केले आहे.