शिर्डीच्‍या साईबाबांच्‍या विरोधात आक्षेपार्ह व्‍हिडिओ प्रसारित करणार्‍या तिघांवर गुन्‍हा नोंद !

देवतांविषयी वादग्रस्‍त वक्‍तव्‍ये करणे टाळा. सामाजिक माध्‍यमावर २ धर्मात आणि समुदायात तेढ निर्माण करणार्‍या पोस्‍ट करू नका. अन्‍यथा कठोर कारवाई करण्‍यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे.

संभाजीनगर स्‍मार्ट सिटीने विनानिविदाच दिले कोट्यवधींचे काम !

स्‍मार्ट सिटीअंतर्गत १ सहस्र १०० कोटी रुपयांची कामे निविदा पद्धत राबवून कंत्राटदारांना देण्‍यात आली आहेत; मात्र याचवेळी कोट्यवधी रुपयांचे एक काम प्रशासनाने साध्‍या अर्जावर दिले आहे.

सुनावणीच्‍या १ दिवस आधी अतिक्रमणांवर किरकोळ कारवाई !

प्रशासकीय अधिकारी अवैध गोष्‍टींच्‍या विरुद्ध तत्त्वनिष्‍ठपणे कारवाई का करत नाहीत ? हे शोधणे आवश्‍यक !

महिलांवरील अत्‍याचारांच्‍या घटनांतील दोषींवर कारवाई करावी !

अशी मागणी करण्‍याची वेळच का येते ? पोलीस प्रशासन स्‍वतःहून त्‍यांचे कर्तव्‍य म्‍हणून कारवाई का करत नाही ?

३३ कोटी ६० लाख रुपयांचे कोकेन बाळगणार्‍या प्रवाशास अटक !

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार

‘आत्‍मनिर्भर’वर भर !

जगातील पाचवी अर्थव्‍यवस्‍था असतांना जनता स्‍वतःच्‍या किमान गरजा भागवण्‍यासाठी सक्षम नसणे, हे चांगले लक्षण नाहीच ! असो, काही खाचखळगे सोडले, तर यंदाचा अर्थसंकल्‍प थेट सर्वसामान्‍यांचे दैनंदिन आयुष्‍य सुखकर करणारा आहे. ‘विविध माध्‍यमांतून अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी शेवट गोड केला आहे’, असेच म्‍हणता येईल !

‘व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस’ ठेवून भीमा नदीमध्‍ये वाळू उपसा चालू !

व्‍हॉट्‍सअ‍ॅप स्‍टेटस ठेवून वाळू उपसा करण्‍यापर्यंत तस्‍करांची मजल जाते यावरून पोलीस, प्रशासन यांचा कोणताही वचक नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते. अशा प्रशासनाकडून कायदा-सुव्‍यवस्‍था कधीतरी राखली जाईल का ? राजरोसपणे चालू असलेला वाळू उपसा प्रशासनाला का दिसत नाही ?

पंढरपूर येथील माघ वारी अपघातमुक्‍त करण्‍यासाठी प्रयत्न ! – सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक

माघ वारीसाठी यात्रेच्‍या कालावधीत महामार्गावर पोलिसांचा विशेष पहारा ठेवण्‍यात येणार आहे. यात मुख्‍यत्‍वेकरून कोल्‍हापूर-पंढरपूर महामार्गावर पोलीस साहाय्‍यता केंद्रे चालू करण्‍यात आली असून याद्वारे वारकर्‍यांचे प्रबोधन करण्‍यात येईल.

अर्थसंकल्पाविषयीचे विशेष अभिप्राय

समाजातील सर्व घटकांचा विचार करणारा अर्थसंकल्प ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

करदात्यांचे ७ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त !

वर्ष २०२३-२४ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर
९ वर्षांनंतर प्रथमच कररचनेत पालट !