आज श्रीराममंदिर, गोंदवलेकर उपासना केंद्राचा भूमीपूजन समारंभ

कवठेमहांकाळ तालुक्यातील दंडोबाच्या पायथ्याशी असणार्‍या गिरी तपोवनजवळ श्रीराममंदिर, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज उपासना केंद्र, गोशाळा आणि अनाथाश्रम यांचे भूमीपूजन, पायाभरणी समारंभ होणार आहे.

समाज वेदांतसाक्षर झाल्यास समाजातून विकृती निघून जातील ! – पू.(डॉ.) श्रीकृष्ण देशमुख

आमच्या पूर्वजांनी प्रत्येक विषयावर अत्यंत सूक्ष्म, सखोल आणि विविधांगी विचार केला आहे. वेदांमधील बारकावे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. समाज वेदांतसाक्षर झाल्यास समाजातून विकृती निघून जातील.

कांदिवली (मुंबई) येथे विश्‍वकल्याणाच्या हेतूने ‘१०० कुण्डीय श्री महालक्ष्मी महायज्ञ’ आणि विराट संत संमेलन यांना प्रारंभ

धर्मसम्राट स्वामी श्री करपात्रीजी महाराज यांचे कृपापात्र शिष्य परमपूज्य यज्ञसम्राट श्री प्रबलजी महाराज यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त परमपूज्य श्री त्र्यंबकेश्‍वर चैतन्य महाराज यांच्या वंदनीय उपस्थितीत कांदिवली (पूर्व), ठाकूर व्हिलेज येथील खेल मैदानावर १०० कुण्डीय श्री महालक्ष्मी महायज्ञ आणि विराट संतसंमेलन यांना प्रारंभ झाला आहे.

भावपूर्ण वातावरणात बाणगंगेची महाआरती

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वाळकेश्‍वर येथील बाणगंगेची आरती १२ नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण वातावरणात पार पडली. या भावसोहळ्याला इस्कॉनचे मुंबईतील प्रमुख पू. गौरांग प्रभु यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून सेवेत सहभागी झाले होते.

आज यवतमाळ येथे ‘प.पू. सद्गुरु दत्त महाराज चोळकर’ यांचा पुण्यतिथी सोहळा !

शहरातील बाजोरिया नगर येथील ‘श्री भागीरथीनाथ गुरुमंदिर’ येथे कार्तिक कृष्ण पक्ष प्रतिपदा (१३ नोव्हेंबर) या तिथीला ‘प.पू. सद्गुरु दत्त महाराज’ यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यतिथीनिमित्त ६ ते १३ नोव्हेंबरपर्यंत भजन, कीर्तन, श्रवणभक्ती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा येथे १३ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत ‘ऋग्वेदसंहिता महायागानुष्ठाना’चे आयोजन

येथील आचार्यानुग्रह (शंकराचार्यांचा मठ) माची पेठेतील ‘श्रीसद्गरुचरणाम्बुजसेवा विश्‍वस्त निधी’ यांच्या वतीने १३ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत महारुद्राभिषेक, सप्रातिख्यऋग्वेद दशग्रन्थमहाभिषेक आणि ‘ऋग्वेदसंहिता महायागानुष्ठाना’चे आयोजन करण्यात आले आहे.

आज वणी (यवतमाळ) येथील रंगनाथ स्वामी मंदिरात वैकुंठ महोत्सव

१० नोव्हेंबर या दिवशी येथील रंगनाथ स्वामी मंदिरात वैकुंठ चतुर्दशी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथे आज परमपूज्य सुमननाथ महाराज (बाळापुरे) यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन

शहरातील बाजोरियानगर येथील श्री भागीरथीनाथ गुरुमंदिर येथे कार्तिक शुक्ल पक्ष एकादशी या तिथीला म्हणजेच ८ नोव्हेंबर या दिवशी परमपूज्य सुमननाथ महाराज (बाळापुरे) यांचा ६५ वा जन्मोत्सव सोहळा दुपारी ४ वाजता साजरा होणार आहे.

नारायणगाव (पुणे) येथे प.पू. काणे महाराज यांचा द्वितीय पुण्यस्मरण सोहळा पार पडला

भक्तांकडून साडेतीन कोटींपेक्षा अधिक नामजपाचा संकल्प पूर्ण 

एका गुरुजींनी हिंदु राष्ट्राची स्थापना, आगामी भीषण संकटकाळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग यांविषयी केलेले मार्गदर्शन

गुरुजींशी हिंदु राष्ट्राची स्थापना या विषयी बोलत असतांना ते म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, ही माझी गेल्या २८ वर्षांपासूनची इच्छा आहे. पुढील ३ वर्षांनंतर जेव्हा मला देवीची आज्ञा होईल, तेव्हा माझे अनुयायी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यासाठी संघटित होणार आहेत.’’