देहलीमध्ये होळीच्या वेळी जपानी तरुणीला बलपूर्वक रंग लावून छेडछाड !

हिंदूंच्या सणाच्या नावाखाली अशी विकृती करणार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ‘सण कसे साजरे करावेत’, हेही त्यांना ठाऊक नाही !

(म्हणे) ‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत !’ – मौलाना महमूद

ज्या सिंधवरून भारताला ओळखले जात होते तेथे आज हिंदूंची झालेली ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी होळीच्या शुभेच्छा देतांना पणतीचे चित्र केले ट्वीट !

‘दिवाळीच्या वेळी पणती लावली जाते, होळीच्या वेळी नाही’, या कारणावरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.

शिगमोत्सवातील सादरीकरणासाठी समयमर्यादेत वाढ करा ! – शिगमोत्सव समित्यांची गोवा सरकारकडे मागणी

राज्य सरकारने शिगमोत्सव साजरा करण्यासाठी रात्री १० पर्यंत समयमर्यादा घातली आहे. या वेळेत रोमटामेळ आणि चित्ररथ यांचे सादरीकरण होऊच शकत नसल्याने सरकारने ही वेळ वाढवून ती रात्री १२ वाजेपर्यंत करावी – पत्रकार परिषदेतील मागणी

जळगाव येथे ‘व्यसनाची होळी’ उपक्रमाचे आयोजन !

‘व्यसनाची होळी’ जागतिक व्यसनमुक्ती दिनाला का आयोजित केली जात नाही ? होळीच्याच दिवशी असे प्रकार का ? असे केल्यास या सणाला ‘होळी’ म्हणणे योग्य ठरेल का ?

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचा हिंदुद्वेष जाणा !

बाडमेर (राजस्थान) येथील जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी जिल्ह्यात होळीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू केला आहे. यात म्हटले आहे, ‘अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील, अशा प्रकारे कुणीही होळी खेळू नये आणि रंग उडवू नये.’

बाडमेर (राजस्थान) में होली के कारण धारा १४४ लागू ! अन्य धर्मियों की भावनाओं को ठेस न पहुचाने का आदेश !

हिन्दुओं की धार्मिक भावनाओं की रक्षा कौन करेगा ?

(म्हणे) ‘होळी लहान करा, पुरणपोळी दान करा !’ – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

होळीमध्ये अग्निदेवतेला अर्पण करायची पोळी गरिबांना वाटायला सांगणार्‍या अंनिसच्या कार्यकर्त्यांनो, तुम्हाला गोरगरिबांना पोळ्या वाटायच्या असतील, तर त्या स्वतंत्रपणे जमा करून का वाटत नाही ? हिंदूंच्या सणांच्या आयत्या ‘पिठा’वर सामाजिक कार्याच्या ‘रेघोट्या’ का मारता ?