ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड पुनर्विचार याचिका प्रविष्ट करणार !

रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाचे प्रकरण : राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला धर्मनिरपेक्षतावाल्यांकडून दिला जातो, हे संतापजनक !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या १० महिलांना प्रवेश नाकारला !

शबरीमला येथील श्री अय्यप्पा मंदिरात १६ नोव्हेंबरला प्रवेश करण्यासाठी विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथून आलेल्या १० महिलांना पोलिसांनी प्रवेश नाकारला आणि त्यांना माघारी पाठवले.

(म्हणे) ‘मला माझी मशीद परत हवी !’ – ओवैसी

‘मला माझी मशीद परत हवी’, असे ट्वीट एम्.आय.एम्.चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी रामजन्मभूमी खटल्याच्या निकालानंतर केले. त्यांच्या या ट्वीटवरून सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होत आहे.

श्रीरामाचे नाव असलेले तोकडे कपडे घालून स्वत:चे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर केले प्रसारित

वाणी कपूर यांनी अशा प्रकारे अन्य धर्मियांच्या देवतांचे नाव असलेले तोकडे कपडे घालण्याचे धाडस केले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळे कोणीही उठतो आणि त्यांच्या श्रद्धास्थानांचा अवमान करतो. वाणी कपूर यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घालून निषेध व्यक्त केल्यास त्यातून हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान करणार्‍यांना एक धडा मिळेल !

शबरीमला आणि राफेल खरेदी प्रकरण यांवरील पुनर्विचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार

शबरीमला आणि राफेल खरेदी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील पुनर्विचार याचिकांवर उद्या १४ नोव्हेंबर या दिवशी निर्णय देण्यात येणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ हे निर्णय देणार आहे.

आंध्रप्रदेशात तेलुगु माध्यमाच्या सर्व शाळा आता इंग्रजी माध्यमांत रूपांतरित होणार

वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचे मातृभाषाद्रोही सरकार ! आंध्रप्रदेशातील तेलुगु माध्यमाच्या सर्व शाळांचे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्यास आंध्रप्रदेशच्या वाय. एस. जगनमोहन रेड्डी सरकारने मान्यता दिली आहे. राज्यात पंचायत राज, महापालिका आणि सरकारी अशा तेलुगु माध्यमाच्या अनुमाने ४४ सहस्र शाळा आहेत.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयाच्या संस्कृत शाखेमध्ये मुसलमान प्राध्यापकाच्या नियुक्तीचा विद्यार्थ्यांकडून विरोध

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयातील संस्कृत विद्या धर्म शाखेच्या विद्यार्थ्यांनी साहाय्यक प्राध्यापक म्हणून फिरोज खान नावाच्या व्यक्तीची नियुक्ती केल्याचा विरोध केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपमान करणार्‍या ‘कौन बनेगा करोडपति ?’ या मालिकेवर बहिष्कार घाला !

‘सोनी’ वाहिनीने स्वतःच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून, तसेच मालिकेचा भाग प्रक्षेपित होत असतांना तळपट्टीद्वारे या चुकीविषयी क्षमा मागितली आहे. असे असले, तरी अनेक हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी, राष्ट्रप्रेमी नागरिक, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी . . . जाहीर क्षमा मागावी’, अशी मागणी केली आहे.

‘गजवा-ए-हिंद’(भारतावर आक्रमण करणे आणि भारताला इस्लाममय करणे) नावाचे ‘अ‍ॅप’ उपलब्ध करून देणार्‍या गूगलचा सामाजिक माध्यमांतून विरोध

गूगलकडून अशा प्रकारची सुविधा उपलब्ध केल्याच्या प्रकरणी केंद्र सरकारने गूगलवर कठोर कारवाई केली पाहिजे आणि पुन्हा असे कोणी करण्याचे धाडस करू नये, असा धाक निर्माण केला पाहिजे !

‘कौन बनेगा करोडपति ?’ में छत्रपति शिवाजी महाराज का उल्लेख केवल शिवाजी और औरंगजेब का सम्राट किया गया !

राष्ट्रपुरुषों का अनादर रोको !