क्रांतीकारकांचा आदर्श ठेवूनच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य केले पाहिजे ! – हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता राजेश जोलियाजी

हिंदु जनजागृती समितीचे श्री. विजय पाटील यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ आणि ‘राष्ट्ररक्षण’ या विषयी प्रबोधन केले.

हिंदु राष्ट्र-जागृती सभा । नांदी हिंदु राष्ट्राची ।

शक्तीपीठ करवीर नगरी ।
तिथे वसे आदिशक्ती महालक्ष्मी ।

१२ फेब्रुवारीला सोलापूर येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र- जागृती सभेच्या प्रसाराला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर १२ फेब्रुवारी या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेच्या प्रसाराला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन थांबवण्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

भारतात हिंदू बहुसंख्य असूनही हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जाते. धर्म आणि संस्कृती टिकवण्यासाठी हे विडंबन थांबवणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन करणे काळाची आवश्यकता आहे

हिंदु-राष्ट्र जागृती सभा म्हणजे येणार्‍या हिंदु राष्ट्राची नांदी ।

हिंदु-राष्ट्र जागृती सभा तुमच्या दारी येऊनी ठेपल्या ।
या नव्हेत केवळ सभा, ही आहे हिंदु राष्ट्राची सिंहगर्जना, ज्यांनी मुहूर्तमेढ रोवली तुमच्या दारी ।

काश्मिरी हिंदूंप्रमाणे इतरत्रच्या हिंदूंची स्थिती न होण्यासाठी स्वतःची सिद्धता करा ! – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

काश्मिरी हिंदूंना जशा यातना भोगाव्या लागल्या आणि त्यांच्या भूमीमधून पलायन करावे लागले, त्याप्रमाणे भारतात इतरत्रच्या हिंदूंंची स्थिती होऊ नये यासाठी स्वतःची सिद्धता करा अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सज्ज व्हा. आज हिंदु धर्मावर अनेक प्रकारची आक्रमणे होत आहेत.

हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे ! – विनय पानवळकर

आज आपण ज्याला हिंदु धर्म या नावाने ओळखतो त्याचे एक नाव आहे ‘सनातन वैदिक धर्म’. सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंत जे अन्य २ धर्म आपल्याला ठाऊक आहेत. त्यातील एक म्हणजे ‘ख्रिस्ती’ धर्म आणि दुसरा मुसलमानांचा ‘इस्लाम’ धर्म होय.

हिंदु राष्ट्र स्थापनेमुळे राष्ट्र आणि विश्‍व कल्याण हे होणारच आहे ! – पराग बिंड, हिंदु जनजागृती समिती

आमच्यासाठी धर्म आणि राष्ट्र वेगळे नाहीत. आमचे धर्मपुरुष हे सारे राष्ट्रपुरुष आहेत आणि राष्ट्रपुरुषही धर्म पाळणारे आहेत. आम्ही देवतांचे चरण धुतांनासुद्धा ‘या राष्ट्राला बळ प्राप्त होवो’, असा मंत्र म्हणतो. मंत्रपुष्पांजलीमध्येही ‘समुद्रवलयांकित पृथ्वी एक राष्ट्र होवो’, ही प्रार्थना करतो.

हडपसर (जिल्हा पुणे) येथे होणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी ग्रामदेवतांना साकडे

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ फेब्रुवारीला हडपसर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा निर्विघ्नपणे पार पडावी, तसेच हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, या उद्देशाने १३ जानेवारीला येथील ग्रामदेवी श्री महालक्ष्मीदेवीची ओटी भरून प्रार्थना करण्यात आली.

आता केवळ एकच लक्ष, ‘हिंदु राष्ट्र’ ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, सनातन संस्था

हिंदु जनजागृती समितीकडून घेतली जाणारी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ही केवळ सभा नाही. या माध्यमातून हिंदूंना संघटित करण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. या सभेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राविषयी सातत्याने सांगितले जात आहे. हासुद्धा एक प्रकारच्या स्वातंत्र्यसमराचाच भाग आहे.