भाजपने हिंदूंच्या सूत्रांवरून लोकसभा निवडणूक लढवल्यास दंगली होतील ! – अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेची माहिती

अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेला जी माहिती मिळते, ती भारतीय गुप्तचर संस्थांना का मिळत नाही आणि मिळाली, तर सरकार जनतेला सतर्क का करत नाहीत ?

हिंदु राष्ट्राची पायाभरणी जळगावमध्ये करू !

आपल्या आराध्य देवतेने घालून दिलेला हा आदर्श डोळ्यांपुढे ठेवत ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची पायाभरणी जळगावमध्ये करू’, असा उद्घोष जळगाववासियांनी १३ जानेवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेत केला.

झोकून देऊन धर्मकार्य करणारे धर्मप्रेमी हेच जळगाव येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या यशस्वीतेचे शिलेदार !

तळमळीने धर्मकार्य करणार्‍या या शिलेदारांचा सर्वत्रच्या हिंदूंनी आदर्श घेऊन हिंदु राष्ट्रासाठी कृतीप्रवण व्हावे !

दोष-अहं यांवर मात करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वत:पासूनच आरंभ करणार !

पनवेल येथे १३ जानेवारी या दिवशी कृष्णभारती सभागृहात दुपारी २ ते सायंकाळी ७.३० या कालावधीत हिंदूसंघटन कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत १० हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ‘स्वत:मध्ये असलेल्या दोष-अहंचे निर्मूलन कसे करायचे ?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण ! – प्रशांत परब, प्रखर राष्ट्रप्रेमी

अनेक धर्मग्रंथ, पौराणिक स्थळे रामजन्मभूमीचे प्रत्यक्ष प्रमाण असताना हा वाद न्यायालयात जाणे अपेक्षित नव्हतेच. हिंदूंना त्यांच्या श्रद्धास्थानाचे प्रमाण द्यावे लागणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे, असे मत प्रखर राष्ट्रप्रेमी श्री. प्रशांत परब यांनी येथे व्यक्त केले.

सानपाडा येथे राममंदिरासाठी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे संघटित झालेल्या हिंदुत्वनिष्ठांचे विचार

राममंदिर बांधण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आम्ही हिंदूंनी नरेंद्र मोदी यांना एक हाती सत्ता दिली; परंतु आता त्यांना त्याचा विसर पडला आहे. आम्ही मोदींना चेतावणी देतो की, राममंदिर बांधण्याचा अध्यादेश काढला नाही, तर आमच्याकडे पर्याय आहे…..

अयोध्येत भव्य राममंदिर झाल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – राज वर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

अयोध्येत राममंदिर व्हावे, यासाठी देशात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. आमच्या पूर्वजांनी बांधलेले राममंदिर आक्रमकांनी तोडले. हा देश हिंदूंचा आहे. राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे.

हिंदुत्वाचा आदर्श : पंडित मदन मोहन मालवीय !

कै. तात्यासाहेब केळकर यांनी एके ठिकाणी म्हटले होते, ‘हिंदुत्वाचा आदर्श कोण ?, असा मला कोणी प्रश्‍न केला, तर मी हिंदुस्थानातील एकाच विभूतीकडे बोट दाखवीन. ती म्हणजे पंडित मदन मोहन मालवीयजी !

कोपरगाव येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे यशस्वी आयोजन करण्याचा आणि सभेला सर्वतोपरी साहाय्य करण्याचा निर्धार येथील हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केला. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट हे नुकतेच कोपरगाव येथे आले असतांना स्थानिक हिंदुत्वनिष्ठांनी त्यांची भेट घेतली.

चार गावांमध्ये हिंदु राष्ट्र स्थापनेचा धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभा अमरावती जिल्ह्यातील वरूडा, दाभा, नांदुरा आणि कुमागड या गावांमध्ये पार पडल्या. हिंदु धर्माची सद्यस्थिती आणि त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेचे महत्त्व हिंदूंना कळावे या उद्देशाने या सभांचे आयोजन करण्यात आले होते.


Multi Language |Offline reading | PDF