कलम ‘३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन ! – राष्ट्रीय वारकरी परिषद

आपण घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक असून देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. एकाच दिवसात सर्व प्रश्‍न मार्गी लावून कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याविषयी सरकारचे विशेष अभिनंदन !

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची काश्मीरविषयक निर्णयावर टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची री ओढत ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील संभाजीची भूमिका वठवणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रसरकारच्या काश्मीरविषयक निर्णयावर टीका केली आहे.

‘पाकव्याप्त काश्मीर’साठी जीवही देऊ ! – गृहमंत्री अमित शहा

मी जेव्हा ‘जम्मू-काश्मीर’ असे म्हणतो, तेव्हा ‘पाकव्याप्त काश्मीर’ आणि ‘अक्साई चीन’ हा त्याचाच भाग आहे, असे अभिप्रेत असते. ‘पाकव्याप्त काश्मीर’ हा जम्मू-काश्मीरचाच भाग असून तो मिळवण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत केले.

गेल्या ७० वर्षांपासून हिंदुस्थानच्या माथ्यावर लागलेला कलंक सरकारने नष्ट केला ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

क्रांतीदिन, स्वातंत्र्यदिन आणि आता काश्मीरला मोकळा श्‍वास देणारा ५ ऑगस्ट हा ऐतिहासिक दिन असून यामुळे ऑगस्ट मासाचे पावित्र्य आणखी वाढले आहे.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची प्रक्रिया काश्मीरपासून चालू झाली ! – राहुल कौल, पनून कश्मीर

जम्मू-काश्मीरच्या संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांच्या संदर्भात प्रतिक्रिया

‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम

कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.

काश्मीरच्या विकासाला गती मिळेल ! – ब्रिगेडियर (निवृत्त) हेमंत महाजन, पुणे

केंद्र सरकारने एक अतिशय चांगले पाऊल उचलले आहे. कलम ३७० आणि ३५ (अ) यांमुळे काश्मीरची आर्थिक प्रगती पूर्णपणे थांबली होती. गेली ७१ वर्षे काश्मीरच्या विकासासाठी प्रचंड पैसा येत होता; पण तो तेथील २०० ते ३०० मुख्य कुटुंबांच्या खिशांत जायचा.

३७० कलम रहित करण्यावर उपहासात्मक ट्वीट करणार्‍या शोभा डे यांची नेटकर्‍यांकडून कानउघाडणी

‘प्रिय अमित शहा, तुम्ही काश्मीर प्रश्‍न सोडवला आहात, तर आता साकीनाक्याच्या वाहतूककोंडीची समस्याही सोडवा. ही समस्यादेखील १९४७ पासून अद्याप सुटलेली नाही’, असे उपहासात्मक ट्वीट करणार्‍या लेखिका शोभा डे

जम्मू-काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेश

केंद्रातील भाजप सरकारकडून जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन नवीन केंद्रशासित राज्ये निर्माण करण्यात आली आहेत.

(म्हणे) ‘भाजपने राज्यघटनेची हत्या केली !’ – गुलाम नबी आझाद

आतापर्यंत राज्यघटनेची हत्या काँग्रेसनेच केली होती, ती रोखण्याचे काम भाजप सरकारने केले आहे ! ज्यांना राज्यघटनेची हत्या झाली, असे वाटते त्यांनी भारत सोडून निघून जावे !


Multi Language |Offline reading | PDF