रामजन्मभूमी खटल्याच्या संदर्भातील काही वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे !

सर्वोच्च न्यायालयात ७ महत्त्वाच्या सूत्रांवर दोन्ही पक्षकारांकडून जोरदार वाद-प्रतिवाद केला. ही प्रमुख सूत्रे कोणती आहेत आणि यांवर दोन्ही पक्षांच्या वतीने काय प्रतिवाद केला आहे, ते पाहू या. तसेच या सूत्रावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने मांडलेली सूत्रेही पाहूया.

प्रभु श्रीरामचंद्रांच्या मंदिर उभारणीचा सुवर्णक्षण दृष्टीक्षेपात !

गेल्या ५ शतकांपासून हिंदूंच्या २५ हून अधिक पिढ्या ज्या मंदिराच्या उभारणीची चातकाप्रमाणे वाट पाहत आल्या आहेत, ज्या सहस्रावधी हिंदूंनी प्रभु श्रीरामाला आपल्या जीवनाचे सर्वस्व मानून त्याच्यासाठी बलीदान दिले

वर्ष २०१० प्रमाणेच आताही राममंदिराच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मन की बात’मधून सूचक विधान – त्या वेळी मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती असूनही कोणीही वातावरण ढवळून निघेल, असे बोलले नव्हते. हे सर्व देशातील एकतेमुळे होत असून ती आपली मोठी शक्ती आहे. त्याप्रमाणेच आताही राममंदिराच्या निकालाचा सर्वांनी आदर करावा.

प्रकाश ? नव्हे अंधकार !

दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज यांनी काही दिवसांपूर्वी रामलीलेविषयी अश्‍लाघ्य वक्तव्य केले. ‘रामलीला पाहणे हे लहान मुलांची अश्‍लील चित्रफीत (पॉर्न) पाहण्यासारखे आहे’, असे ते वक्तव्य होते. एका चर्चासत्रात सहभागी होत त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांचा सर्व थरांतून निषेध व्यक्त करण्यात आला आणि अद्यापही येत आहे.