कचरामुक्त स्पर्धेत तीर्थक्षेत्र जेजुरीला तीन तारांकित मानांकन

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या कचरामुक्त स्पर्धेत जेजुरी शहराला ३ तारांकित (थ्री स्टार) मानांकन मिळाले आहे. गेल्या वर्षी शहराला २ तारांकित मानांकन मिळाले होते.

‘कोरोना’ म्हणजे ‘कोई रोडपर ना निकले’

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २४ मार्च या दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सामाजिक माध्यमांतून कोरोनाविषयी योग्य प्रबोधन करणार्‍यांचा उल्लेख केला होता. यामध्ये त्यांना आवडलेला फलक म्हणजे ‘को – कोई, रो – रोडपर, ना – ना निकले’, अशाप्रकारे कोरोनाचा अर्थ दर्शवणारा होता.