३० वर्षांपूर्वी घेतलेले २०० रुपये केनियाच्या खासदारांनी संभाजीनगर येथे येऊन दिले

३० वर्षांपूर्वी संभाजीनगर येथील एका व्यक्तीकडून घेतलेले २०० रुपये केनियाचे खासदार रिचर्ड टोंगी यांनी त्याच्या घरी आणून दिले. भ्रष्टाचार करून जनतेचे पैसे लुटणार्‍या राज्यकर्त्यांनी यातून बोध घ्यावा !

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार !

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

दूरचित्रवाहिनीवरील मालिकेतील फाशीच्या दृश्याचे अनुकरण करणार्‍या मुलीचा मृत्यू

लहान मुलांवर परिणाम होतील, अशी दृश्ये प्रसारित करणार्‍या दूरचित्रवाहिन्या आणि अशा दृश्यांना अनुमती देणार्‍या यंत्रणा यांना या मृत्यूसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे ! तसेच यातून धडा घेऊन अशी दृश्ये प्रक्षेपित करण्यावर बंदी घातली पाहिजे !

दादर येथे विवाहानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार

दादर येथील सरस्वती विद्यालयात ८ मे या दिवशी सनातनचे साधक श्री. मोनिष चित्रे यांचा विवाह सोहळा झाला. या वेळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने धर्मप्रसार करण्यात आला.

साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार

साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविषयी पुन्हा एकदा क्षमा मागत २१ घंट्यांचे मौन व्रत करणार असल्याचे घोषित केले आहे. साध्वी यांनी ट्विटरवर म्हटले….

पतीने शेंडी ठेवल्याने पत्नीने घटस्फोट मागितला

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे अशा समस्या निर्माण होतात ! शेंडीचे महत्त्व ठाऊक असते, तर पत्नीनेच पतीला ती ठेवण्यासाठी सांगितले असते !

आंतरजातीय विवाहातील अपत्य आईची जात लावण्याची मागणी करू शकते ! – नागपूर खंडपिठाचा निर्णय

आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याचे अपत्य स्वतःला आईची जात लावण्याची मागणी करू शकते. अशा अपत्यांना आईची जात नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने दिला.

स्तोत्रांजली बालसंस्कारच्या वतीने ९ मे या दिवशी अर्धपिंपरी नारायण मंदिर येथे ‘सामूहिक व्रतबंध सोहळा’ !

सद्गुरु चिन्मयानंद संस्थान उंबरखेड यांच्या आशीर्वादाने देशपांडे परिवार आणि स्तोत्रांजली बालसंस्कार यांच्या वतीने ९ मे या दिवशी अर्धपिंपरी नारायण महाराज मंदिर (ता. गेवराई, जिल्हा बीड) येथे सकाळी १०.३५ वाजता ‘सामूहिक व्रतबंध सोहळ्या’चे आयोजन करण्यात आलेे आहे.

प्रेमभावाने इतरांचा विचार करणारा, सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असलेला आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव असलेला रामनाथी आश्रमातील कु. मुकुल प्रभु (वय ८ वर्षे) !

चैत्र कृष्ण पक्ष पंचमी, बुधवार (२४.४.२०१९) या दिवशी कु. मुकुल प्रभु याचा उपनयन संस्कार आहे. त्यानिमित्त त्याची आई, बहीण आणि एक साधक यांनी सांगितलेली त्याची गुणवैशिष्ट्ये, त्याच्यात झालेले पालट आणि त्याच्या मुंजीची सिद्धता करतांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF