जगभरातील ८१ देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट येणार ! – जागतिक आरोग्य संघटना

जगभरातील २०० हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यातील बहुतांश देशांमध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरली नसतांनाच आता ८१ देशांमध्ये दुसरी लाट येण्याची स्थिती निर्माण झाली आहे, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने दिली.

आमदारकीसाठी राजू शेट्टी यांनी स्वाभिमान विकला ! – जय शिवराय किसान मोर्चाचा आरोप

ज्या बारामतीत राजू शेट्टी यांनी चळवळीचा इतिहास रचला, त्याच बारामतीत आमदारकीसाठी त्यांना शरण जावे लागले. शेट्टी यांनी आमदारकीसाठी स्वाभिमान विकला असून सामान्य कार्यकर्त्यांच्या निष्ठेची त्यांनी चेष्टा केली.

कोरोनापासून लहान मुलेही सुरक्षित नाहीत ! – जागतिक आरोग्य संघटनेची चेतावणी

चीनमध्ये कोरोनामुळे १४ वर्षाच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे, तर अमेरिकेत १२ वर्षांची एक मुलगी ‘व्हेंटिलेटर’वर आहे…….

नोटा हाताळल्यास हात स्वच्छ धुवा ! – इंडियन बँक्स असोसिएशनचे आवाहन

चलनी नोटा हाताळल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत, तसेच नोटा किंवा नाणी हाताळून संसर्गाला आमंत्रण देण्यापेक्षा लोकांनी डिजिटल बँकिंगचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन इंडियन बँक्स असोसिएशनने नागरिकांना केले आहे.