पाठ्यपुस्तकांत भारताच्या तेजस्वी इतिहासाचा समावेश करण्याचा ठराव हिंदु राष्ट्र संसदेत एकमताने संमत !
भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद
भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित शिक्षण व्यवस्थेची आवश्यकता ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, उपसभापती, हिंदु राष्ट्र संसद
‘‘राष्ट्रनिर्मितीसाठी प्राचीन शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांनी आत्मसात् करावे. भगवद्गीतेमध्येही ही शिकवण दिली आहे. त्याच प्रमाणे मानवी जीवनाच्या उन्नत्तीसाठी अध्यात्म आणि विज्ञानाच्या एकत्रीकरणातून शिक्षण प्रदान करावे.’’
देशातील छोट्यातील छोटी न्यायपालिका आणि सर्वाेच्च न्यायपालिका यांचे कामकाज जर भगवद्गीतेची साक्ष घेऊन चालू होत असेल, तर भगवद्गीतेच्या शिक्षणाला सरकार विरोध का करत आहे ?
बर्याचदा लहान आणि युवावस्थेतील मुले यांना भगवद्गीता वाचण्यास किंवा पाठ करण्यास सांगितले जाते; मात्र ‘त्यांना त्यांच्या सध्याच्या स्थितीला गीतेचा खरोखर किती उपयोग होईल’, याकडे लक्ष दिले जात नाही.