सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले अयोध्येतील रामललाचे दर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या संकल्पाला प्रभु श्रीरामाचे आशीर्वाद लाभावेत, यासाठी सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी येथील रामललाचे दर्शन घेतले.

फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातनच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांचा देहत्याग

‘फलटण (जिल्हा सातारा) येथील सनातनच्या ३१ व्या संत पू. (श्रीमती) सरस्वती कापसेआजी (वय ९१ वर्षे) यांनी १३ नोव्हेंबर २०१९ च्या रात्री राहत्या घरी देहत्याग केला. त्यांच्या पश्‍चात ३ मुलगे, २ सुना, ३ मुली, ३ जावई, नातवंडे, नातसुना आणि पतवंडे असा परिवार आहे.

सनातनच्या आश्रमातून होणारे धर्मकार्य संपूर्ण विश्‍वात पसरेल !

‘सनातनचा रामनाथी आश्रम हे शिवक्षेत्र असून या स्थानाला भगवान शिवाचा आशीर्वाद आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे मानवरूपात भगवान शिवच आहेत. आश्रमात होणारे धर्मकार्य तेच करवून घेत आहेत. सनातनच्या सर्व साधकांना माझा पूर्ण आशीर्वाद आहे. – श्री श्री श्री बालमंजुनाथ स्वामीजी

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात हंगरहळ्ळी (कर्नाटक) येथील श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीचे मंगलमय वातावरणात शुभागमन !

भक्ताच्या हाकेला सत्वर प्रतिसाद देणारी, त्याच्यावर कृपेचा वर्षाव करणारी, कधी वात्सलमयी, तर कधी रौद्र रूप धारण करून भक्तांचा उद्धार करणार्‍या आदिशक्तीचे ६ नोव्हेंबर या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात शुभागमन झाले ! जी शक्ती चराचरात व्यापलेली आहे, ज्या शक्तीच्या योगे सारे विश्‍व संचलित होते, त्या आदिशक्तीच्या चरणी वंदन !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या चैतन्यमय वातावरणात झाला पंचमहाभूत याग

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, पंचमहाभूतांच्या प्रकोपांपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सूक्ष्मातील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी पुणे येथील संत प.पू. आबा उपाध्ये यांच्या आज्ञेने १८ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमात ‘पंचमहाभूत याग’ करण्यात आला.

नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील याज्ञिक पीठम्चे संस्थापक डॉ. किशोर स्वामी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट

नागोला हयातनगर (आंध्रप्रदेश) येथील ‘याज्ञिक पीठम्’चे संस्थापक डॉ. पी.टी.जी.एस्. किशोर स्वामी आणि पीठम्चे व्यवस्थापक श्री. पुरुषोत्तमाचार्य यांनी १९ ऑक्टोबर २०१९ या दिवशी येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली.