‘मंकीपॉक्स’विषयी मुंबई महानगरपालिकेकडून जनजागृतीस प्रारंभ !
‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू केली आहे. मुंबई विमानतळावर परदेशातून येणार्या प्रवाशांची पडताळणी केली जात आहे. ‘मंकीपॉक्स’ हा विषाणूजन्य झुनोटिक रोग असून तो प्रामुख्याने मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील उष्णकटीबंधीय भागात आढळतो.