हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाकडून संतांना शिबिरांसाठी भूमी देण्यास नकार !

विविध आखाड्यांकडून संतांसाठी सरकार आणि मेळा प्रशासन यांच्याकडे गंगानदी किनारी शिबिर उभारण्यासाठी भूमी देण्याची मागणी केली जात आहे. काही संतांनी भूमी न मिळाल्यास कुंभमेळ्यावर बहिष्कार घालण्याची चेतावणी दिली आहे.

परात्पर गुरुदेवांवरील दृढ श्रद्धेच्या बळावर अत्यंत कठीण प्रसंगाला सामोरे जाणार्‍या साधिका !

रात्री झोपतांना गुरुदेव माझ्याकडून भिंतीवर व्यष्टी साधनेचा आढावा मानसरित्या लिहून घ्यायचे आणि नंतर मी आढावा गुरुदेवांना सांगायचे.

एका साधिकेला एका राज्यातील एका रुग्णालयात आलेला वाईट अनुभव

‘ताप, सर्दी आणि खोकला असल्यामुळे २३.३.२०२० या दिवशी मी माझ्या भावाला एका राज्यातील एका सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन गेले होते. त्या वेळी तेथील एका आधुनिक वैद्यांनी त्याची कागदपत्रे पाहिली आणि त्याला कोरोनाग्रस्त ठरवूनच त्या माझ्याशी बोलू लागल्या.

मुंबई महानगरपालिकेकडून धडक मोहीम

मॉल, रेल्वेस्थानके, समारंभ, हॉटेल आदी ठिकाणी विविध पथके मास्क घालणे बंधनकारक असल्याचे प्रबोधन करून न घालणार्‍यांना दंडही करण्यात येत आहे. जम्बो कोविड सेंटरच्या सुविधा चालू करण्यात आल्या आहेत, असे महापौरांनी सांगितले. 

कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा ! – राजगोपाल देवरा, पालकसचिव

कोरोनाविषयी प्रतिदिनच्या चाचण्या वाढवा, व्हेंटिलेटर्स आणि उपलब्ध साधनसामुग्रीचा आढावा घ्या, सनियंत्रण करा. कोरोनाविषयी सूक्ष्म नियोजन करा आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (संपर्क शोध मोहिम) वाढवा, अशी सूचना पालकसचिव राजगोपाल देवरा यांनी केली.

यापुढे मुंबईमध्ये घरातील विलगीकरण बंद, संशयित व्यक्तीला ‘कोविड सेंटर’ मध्ये जावेच लागेल ! – सौ. किशोरी पेडणेकर, महापौर

यापुढे कोरोनाची लक्षणे नसलेल्या नागरिकांनाही घरात विलगीकरण करण्यात येणार नाही. प्रत्येकाला ‘कोविड सेंटर’मध्ये जावेच लागेल, अशी सक्त सूचना मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी १९ फेब्रुवारी या दिवशी दिली.

विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई

१८ फेब्रुवारी या दिवशी मुंबईत ७३६ कोरोनाबाधित रुग्ण आढलले, तर ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ५ हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या इमारती सील करण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली आहे.

सीओपीडी मुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक !

घरोघरी होणार्‍या वायू प्रदूषणामुळे क्रॉनिक ओबस्ट्रक्टिव पल्मनरी डिसीज हा आजार होण्याची दाट शक्यता !

माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर आवश्यक उपाययोजना कराव्यात !

कोरोनाच्या संकटकाळात माघ वारी पार पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रथमोपचार केंद्राची उभारणी करावी.