गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याच्या व्यवस्थापनामध्ये दिरंगाई आणि गलथानपणा झाल्याचे शासननियुक्त समितीच्या अहवालातून उघड !

शासनाने संबंधितांवर कारवाई करावी, ही अपेक्षा !

नाशिक जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया यांच्या रुग्णसंख्येत वाढ !

‘पेस्ट कंट्रोल’, धूर फवारणी करण्यात येऊन पाण्यात गप्पी मासे सोडले जात आहेत, असे महापालिका प्रशासनाने सांगितले. व्याधींचे रुग्ण अधिक प्रमाणात असल्याने अनेक रुग्णालयांत रुग्णांसाठी खाटा मिळत नाहीत.

पुणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांनी नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारल्याचा एका सर्वेक्षणात दावा !

अजूनही खासगी रुग्णालय नियंत्रित दरापेक्षा वाढीव देयके आकारतात, हे गंभीर आहे. रुग्णालयांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३३ नवीन रुग्ण

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४३२ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १४ नवीन रुग्णवाहिका उपलब्ध ! – वैभव नाईक, आमदार, शिवसेना

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे….

यवतमाळ येथे दोन आधुनिक वैद्यांच्या वादात उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू !

वैद्यकीय विभाग आणि शस्त्रकर्म विभागातील दोन आधुनिक वैद्यांमध्ये वाद झाला. त्यात ते ‘हा रुग्ण माझ्या विभागातील नाही’, असे म्हणत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ३८ नवीन रुग्ण

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ३८८ आहे. १९ सप्टेंबरला ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४८ सहस्र ६८८ झाली आहे.

राज्यात दिवसभरात ४ सहस्र ४१० रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात आजपर्यंत १ लाख ३८ सहस्र ३८९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

संभाजीनगर येथे घाटी परिसरातील धर्मशाळेत रुग्णांची सर्रास लूट !

खोलीसाठी आचारी मागतो अतिरिक्त ५०० रुपये, गादी, पलंग, चटईच्या नावाखालीही वसुली !