विशेषांकाच्या निमित्ताने…

आध्यात्मिक पातळीवर दिलेल्या या लढ्याचा हा अस्पर्शी पैलू समाजासमोर मांडण्याचाही या अंकातून प्रयत्न करण्यात आला आहे. आता हिंदूंचे दायित्व आणखी वाढले आहे. राममंदिर बांधण्यासह हिंदूंनी आता भारतात आदर्श रामराज्य येण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी हिंदूंमध्ये धर्मतेज निर्माण व्हावे, अशी प्रभु श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रार्थना !

कालमहिम्यानुसार समष्टी साधनेला ७० टक्के, तर व्यष्टी साधनेला ३० टक्के महत्त्व ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था

नामजप, सत्संग, सत्सेवा, सत्साठी त्याग, प्रीती, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृतीसाठी प्रयत्न करणे, ही सरळ अन् सोपी व्यष्टी साधना आहे, तर धर्मप्रसार करणे, ही समष्टी साधना आहे. व्यष्टी साधनेच्या पायावर समष्टी साधना उभी राहत असल्याने समष्टी साधना करणार्‍यांनी व्यष्टी साधना करणेही आवश्यक असते.