‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी ‘क्युआर कोड’ (QR Code) ची सुविधा उपलब्ध !

दैनिक ‘सनातन प्रभात’ हे समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हितासाठी अहोरात्र झटणारे एकमेव दैनिक आहे. दैनिकात सण, धार्मिक उत्सव, व्रते, धर्मशिक्षण आदी विषयांच्या माध्यमातून समाजाचे धर्मप्रबोधन केले जाते.

समर्थ रामदासस्वामींचा अखंड राष्ट्रनिर्मितीचा संकल्प !

आज माघ कृष्ण पक्ष नवमी या दिवशी असलेल्या रामदासनवमी निमित्ताने… साडेतीनशे वर्षांपूर्वी हिंदुस्थानवर पाच मुसलमानी राजे राज्य करत असतांना हिंदुस्थान एक प्रचंड मोठे अखंड राष्ट्र आहे, याची जाणीव मात्र समर्थ रामदासस्वामींना होती. त्या अनुषंगानेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मसंस्थापनेचा आणि अखंड राष्ट्राच्या पुनर्निर्मितीचा उपदेश केला अन् आध्यात्मिक पाठबळ दिले. छत्रपती संभाजी महाराजांपुढेही त्यांनी तोच आदर्श … Read more

स्वतःच्या प्राणांची आहुती देत कोंढाणा किल्ला जिंकून देणारा ‘सिंह’ म्हणजे तानाजी मालुसरे !

‘तानाजी मालुसरे हे सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे होय. छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी; म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्‍वासातील होते. तानाजी मालुसरे हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांसमवेत होते.

जनतेवर अनन्वित अत्याचार करणार्‍या ब्रिटीशांच्या विरोधात मृत्यूनंतरही लढण्याचा निर्धार करून तरुणांसमोर जाज्वल्य राष्ट्राभिमानाचा आदर्श ठेवणारे क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके !

‘ज्या भूमीचे पोटी आपण जन्म घेतला, तिच्याच पोटी ही सर्व लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत उपाशी मरावे आणि आपण कुत्र्याप्रमाणे पोट भरीत राहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश शासनाच्या विरोधात मी बंड पुकारले ! अहो, माझ्या हिंदुस्थानवासी बांधवहो, तुमच्या कल्याणासाठी मी माझे प्राण पणास लावीत आहे.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांची वृत्ते या संदर्भातील रविवारचे विशेष सदर : १६.०२.२०२०

राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत

‘माहितीचा अधिकार’ या शस्त्राचा उपयोग करून कर्नाटकमधील वैद्यकीय महाविद्यालयाला त्याच्या भोंगळ कारभाराची जाणीव करून देणारे अधिवक्ता उमाशंकर मेगुंदी !

‘भारताच्या विद्यमान व्यवस्थेतील अनागोंदीपणा दिवसेंदिवस ठळकपणे दिसू लागला आहे. सर्वत्र दंगली, भ्रष्टाचार, दरोडे, अनैतिकता, परस्परांविषयी असहिष्णुता यांत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे.

युवा पिढी ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या फालतू गोष्टींत वेळ वाया न घालवता राष्ट्रासमोरील समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देईल तो सुदिन !

तरुण पिढीने कोण्या प्रेमविराच्या भाकड कथा ऐकून ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथेचे अंधानुकरण करणे आणि पुढे एकतर्फी प्रेम, प्रेमभंगाच्या वैफल्यातून हत्या, बलात्कार इत्यादी गुन्ह्यांमध्ये वाढ होणे

भारतीय संस्कृती आणि नारायणतत्त्वाची अनुभूती यांचा परस्पर संबंध !

‘निरुक्ताची रचना करणार्‍या यास्कमुनींनी या देशाची व्याख्या करतांना ‘भरतः आदित्यः । तस्य भा भारती ।’ हे वचन लिहिले आहे. त्याचा अर्थ आहे, ‘भरत म्हणजे आदित्य किंवा सूर्य आणि त्यापासून जन्मलेली प्रकाशरूपी संतती म्हणजे भारतीय समाज वा जनता !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या फसव्या प्रेमाला बळी पडल्यामुळे युवतींची होणारी कुचंबणा

१४ फेब्रुवारी या दिवशी ‘व्हॅलेंटाईन डे’ जगभर साजरा करण्यात येतो. ‘व्हॅलेंटाईन डे’चे भयावह घातक दुष्परिणाम जनतेला समजावून सांगणे आवश्यक आहे. त्यासाठी नैतिकतेचे पाठ देणे म्हणजेच जीवनाचे नीतीनियम आणि बंधने पाळावयास भाग पाडणारे धार्मिक शिक्षण देणे किती अपरिहार्य आहेे, हे यावरून आपल्या लक्षात येईल !

‘हिंदुस्थान’ म्हणून ज्ञात असलेली ही भूमी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनेद्वारा पुन्हा ‘भारत’ तथा ‘इंडिया’ म्हणून ओळखली जाऊ लागणे आणि ‘भारत’ या नावाला भव्य पार्श्‍वभूमी असणे

प्राचीन काळी जंबुद्वीप, आर्यावर्त, भरतवर्ष, भारत पुन्हा ‘हिंदुस्थान’ म्हणून ज्ञात असलेली ही भूमी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर घटनेद्वारा पुन्हा ‘भारत’ तथा ‘इंडिया’ म्हणून ओळखली जाऊ लागली. या नामांतराला वास्तविक कोणाचाच विरोध असण्याचे कारण नाही; कारण भारत या नावाला भव्य पार्श्‍वभूमी आहे.