देहली विश्‍वविद्यालयातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासणार्‍या अक्षय लाकडा याला अटक करण्याची मागणी करणारे निवेदन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विटंबना करणार्‍यांवर सरकार कठोरातील कठोर कारवाई करील का ?

विशेषांकाविषयी थोडेसे . . . !

जन्मतः संत असलेले जीव कसे असतात. त्यांचे वागणे, बोलणे, त्यांच्या जन्माविषयी मिळालेले ईश्‍वरी संकेत यांविषयी समाजाला माहिती मिळावी आणि या ईश्‍वरी लीलेचा सर्वांनाच आनंद घेता यावा, हे या विशेषांकाचे प्रयोजन आहे.

हिंदु राष्ट्राची (ईश्‍वरी राज्याची) धुरा सांभाळण्यासाठी ईश्‍वराने दिलेले आणखी एक वरदान ! : पू. वामन राजंदेकर (वय १ वर्ष) !

पृथ्वीवरील दैवी बालके आणि बालक-संत ओळखणारे, तसेच त्यांच्याविषयी अभूतपूर्व आध्यात्मिक संशोधन करणारे जगातील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले !

नांदी असे ही येणार्‍या भीषण काळाची ।

मेघ बहू बरसले किमया ही निसर्गाची ।
नद्या-नाले रौद्र रूप घेती महापुरासी ॥ १ ॥

पंढरपूर येथे ‘श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालय’ (स्वेरी) येथे ‘सत्संगातून राष्ट्रभाव जागृती अभियाना’चा प्रारंभ

वर्षभर महाविद्यालयातील अनुमाने ४ सहस्र विद्यार्थी याचा लाभ घेणार आहेत. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक यशपाल खेडकर यांनी केले.

भक्तीचा धागा बांधू जगज्जेत्या भावाला ।

श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळीपौर्णिमा ।
चला, रक्षणकर्त्याला भक्तीच्या बंधनात बांधूया ॥ १ ॥

राखीपौर्णिमेनिमित्त सर्वत्रच्या हिंदु बांधवांना आवाहन !

‘श्रावण पौर्णिमा, म्हणजेच राखीपौर्णिमा ! १५.८.२०१९ या दिवशी ‘राखीपौर्णिमा’ आहे. हिंदु संस्कृतीनुसार या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या उजव्या हाताला राखी बांधते.

सनातन धर्म आणि संस्कृती यांवरील हिंदु स्त्रियांची निष्ठा भग्न झाल्याने राष्ट्र अन् धर्म यांची अपरिमित हानी होणे

‘पाश्‍चात्त्य शिक्षणाने आम्ही पुरुष श्रद्धाहीन झालोच आहोत. आमच्या धर्मपरंपरा, रितीरिवाज, कुलाचारादी परंपरा अशा प्रत्येक आचाराविषयी संशय आणि अश्रद्धा हा आमचा स्वभाव झाला आहे….

लोकमान्य टिळक : एक लोकोत्तर नेता !

विनम्र अभिवादन !

१ ऑगस्ट २०१९ या दिवशी लोकमान्य टिळक यांचे ९९ वे पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने…

‘३१.७.१९२० च्या मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी मुंबई येथील सरदारगृहात लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. १.८.१९२० या दिवशी मुंबईत निघालेल्या टिळकांच्या अंत्ययात्रेला अडीच लाख लोक होते. त्यांच्यावर गिरगावच्या चौपाटीवर मुंबई सरकारने अग्नीसंस्कार करण्याची विशेष परवानगी दिली.

१. भारतीय समाजाच्या मनात ‘स्वातंत्र्य लालसा’ प्रथम टिळकांनी निर्माण करणे

वर्ष १८८० ते १९२० हे ‘टिळक युग’ या नावाने ओळखले जाते. लोकमान्य टिळकांनी सतत ४० वर्षे भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध भारतीय समाजमनात असंतोष निर्माण केला. इंग्रजी राजवट ही प्रथम भारतीय समाजाला सुखावह वाटली. त्या इंग्रजी राजवटीचे भारतीय समाज गुणगान करत होता; परंतु ‘आपण परकीय राजवटीत आहोत. आपल्याला स्वातंत्र्य नाही’, हे भान भारतीय समाज विसरला होता. त्या भारतीय समाजाच्या मनात ‘स्वातंत्र्य लालसा’ प्रथम लोकमान्य टिळकांनी निर्माण केली.

२. शाळा आणि महाविद्यालय यांची स्थापना

नवीन पिढीला शिक्षण देण्यासाठी टिळक आणि आगरकर यांनी चिपळूणकरांच्या समवेत वर्ष १८८० मध्ये ‘न्यू इंग्लीश स्कूल’ शाळेची स्थापना केली. तेथे मासिक ३० रुपये पगारावर त्यांनी शिक्षक म्हणून काम करायला आरंभ केला. शाळेची भरभराट झाल्यावर पुढे या त्रयींनी ‘फर्ग्युसन कॉलेज’ची स्थापना केली. टिळक शाळा आणि महाविद्यालय येथे संस्कृत अन् गणित या दोन विषयांचे अध्यापन करायचे.

३. जहाल लेखांमुळे सरकारने खटले भरणे

समाजमनाला राष्ट्रीय वळण लावणे आणि समाजाची सुख-दुःखे समजून ती सोडवणे, यांसाठी टिळकांनी ‘केसरी’ हे मराठी साप्ताहिक काढले, तर अमराठी भारतियांसाठी ‘मराठा’ हे इंग्रजी साप्ताहिक काढले. ही दोन्ही साप्ताहिके त्यांनी निर्भयपणे चालवली. वर्ष १८८२ मध्ये ‘केसरी’ या साप्ताहिकात कोल्हापूर प्रकरणासंदर्भात कडक लेख आले. त्याचा शेवट फौजदारी खटल्यात होऊन टिळक-आगरकर यांना जबाबदार संपादक या नात्याने ४ मासांची साध्या कैदेची शिक्षा झाली. या खटल्याच्या रूपाने ब्रिटीश सरकारने टिळकांवर वर्ष १८८१ पासून जे शस्त्र उचलले, ते वर्ष १९१६ पर्यंत खाली ठेवले नाही. या अवधीत टिळकांवर ३ फौजदारी खटले झाले. त्यांतील दुसरा खटला हा वर्ष १८९७ मध्ये पुण्यातील प्लेगवर सरकारने लोकांवर केलेल्या अत्याचारांविरुद्ध केसरीत कडक लेख लिहिले, त्यावर होता. त्यानंतर सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. वर्ष १९०८ मध्ये बंगालमध्ये बॉम्बस्फोट होऊ लागले. त्यावर टिळकांनी सरकारवर कडक टीका केलेले लेख लिहिल्यामुळे तिसरा खटला भरला. या दोन फौजदारी खटल्यांमुळे त्यांना एकूण ७ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. वर्ष १९१५ चा खटला हा तुरुंगवासासाठी नव्हता, तर राजद्रोह फिरून न करण्याबद्दलचा, तारण मिळवण्याच्या स्वरूपाचा होता. त्यात टिळकांना अंतत: यश आले.

४. लोकमान्य टिळकांमधील गुण

व्यक्ती या नात्याने टिळकांच्या अंगी धैर्य, चिकाटी, इमानी आणि करारी स्वभाव, धाडस, स्वार्थत्याग अन् आपल्या शब्दांचा अभिमान, देशभक्ती इत्यादी गुण होते.

५. इतिहासात तोड नाही, असे स्थान

टाइम्सकारांनी टिळकांच्या चरित्राचे वर्णन करतांना पुढीलप्रमाणे म्हटले आहे, ‘टिळकांच्या राजकीय मोहिमेचा दरारा मोठा कठीण. कोणत्याही देशाच्या राजकीय घडामोडींच्या इतिहासात त्याला तोड सापडायची नाही.’ रौलट आणि कामगिरीच्या अहवालातही क्रांतीकारक चळवळीचे मंथन करून त्यातून काढलेल्या निष्कर्षांवर त्यांचीच अग्रपूजा करण्यात आली आहे.

६. ‘हिंदुस्थानातील असंतोषाचे जनक’ ही पदवी मिळणे

चिरोल साहेबाने आपल्या ‘हिंदुस्थानातील असंतोष’ या प्रसिद्ध पुस्तकात टिळकांना ‘फादर ऑफ इंडियन अनरेस्ट’ म्हणजे (?) हिंदुस्थातील असंतोषाचे जनक’ अशी पदवी दिली होती.

७. टिळकांचे लोकोत्तर गुण आणि कामगिरी

७ अ. सत्तानिष्ठा : वर्ष १८८२ मध्ये ‘कोल्हापूर प्रकरणा’च्या वेळी टिळक अवघे २६ वर्षांचे होते; परंतु इतक्या अल्प वयातही त्यांनी या खटल्याच्या कामी आवश्यक ते कायद्याचे ज्ञान आणि शिक्षा सोसण्याचे धैर्य तर दाखवलेच; परंतु इमानदारी राखून केवळ इमानाखातर आपल्या बचावाचा पुरावा आपल्या हातांनी जाळला. या गोष्टीचा संबंध पुढे फर्ग्युसन महाविद्यालयासाठी एक मोठी देणगी मिळून ते स्थापन होण्यास कारणीभूत झाला.

७ आ. अन्यायाविरुद्ध लढणे : १८८८-८९ मध्ये टिळकांनी ‘क्रॉफर्ड मामलेदार प्रकरणी’ केलेल्या कामगिरीने त्यांच्या अंगच्या उद्योगशीलतेचा पुरावा पुण्याच्या लोकांस पटला. क्रॉफर्ड प्रकरणात मुख्यतः साहेब दोषी असता ते शिक्षेवाचून सुटले आणि बिचार्‍या मामलेदारांवर मात्र बडतर्फी आदळली. हा अन्याय सहन न होऊन टिळकांनी अर्ज लिहून आणि सभा भरवून मामलेदारांची दाद ब्रिटीश संसदेपर्यंत लावून मुंबई सरकारकडून ‘मामलेदार्स इंडिम्निटी अ‍ॅक्ट’ संमत करून घेतला.

७ इ. कुशाग्र बुद्धी, संस्कृत ग्रंथांचे ज्ञान आणि वादविवादाची उत्कृष्ट हातोटी : वर्ष १८९१ मध्ये संमतीबिलाच्या युद्धप्रसंगी टिळकांनी डॉ. भांडारकरप्रभृती पंडिताशी वाद केला. त्यात त्यांची कुशाग्र बुद्धी, संस्कृत ग्रंथांचे परिशीलन आणि वादविवादाची उत्कृष्ट हातोटी लोकनिदर्शनास आली. टिळक आणि सुधारक मंडळी यांच्यातील वादाचे मुख्य सूत्र ‘सरकारने धार्मिक विषयांत हात घालू नये. सुधारणा इष्ट असली, तरी ती शक्य तितकी लोकमतानेच घडवून आणावी’, हेच होते. या वादामुळेच टिळकांचे नाव मुंबई इलाख्याबाहेर प्रथम प्रसिद्धीस आले.

७ ई. निर्भीडपणा आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान : १८९२-९३ मध्ये हिंदु-मुसलमान लोकांमधील तंटे विकोपास गेले. या प्रसंगी खरा दोष सरकारी अधिकार्‍यांकडे असून त्यांच्या चिथावणीमुळे मुसलमान लोक दुराग्रह करतात आणि ‘केवळ मुसलमानांची मने बिथरतील; म्हणून हिंदूंच्या सभा भरवू नयेत, असे म्हणणे चूक आहे’, असे मत टिळकांनी निर्भीडपणे मांडले. टिळकांनी केलेल्या या चळवळीमुळे, विशेषतः टिळकांनी प्रसिद्ध केलेल्या काही सरकारी कागदपत्रांमुळे सरकारचा पक्षपात उघडकीस आला आणि बिचार्‍या हिंदु लोकांना ‘आपला कोणीतरी वाली आहे’, असे कळून आले. गणपति उत्सवाच्या मुळाशीही त्यांचा योग्य प्रकारच्या हिंदुत्वाचा स्वाभिमानच होता.

७ उ. कायदेपटू : वर्ष १८५४ मध्ये बापट प्रकरणात टिळकांनी बापट आणि सयाजीराव गायकवाड यांची बाजू मांडली.

७ ऊ. मैत्रीसाठी झीज सोसणे : मित्रकार्याकरता झीज सोसण्याचे टिळकांचे गुण ‘बाबामहाराज’ प्रकरणी दिसून आले.

८. कार्यामुळे लोकांनी निवडून देणे

वर्ष १८९५ मध्ये टिळकांची कामगिरी महाराष्ट्राला इतकी आवडली की, मध्यभागाच्या ‘कायदे कौन्सिला’त निवडणुकीची एक जागा मिळाली आणि आणखी २ वर्षानंतर नवीन निवडणूक झाली, तेव्हा मतदारांनी टिळकांनाच निवडले.

९. दुष्काळातील लोकजागृती

वर्ष १८९६ मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. त्या वेळी टिळकांनी शेतकर्‍यांची बाजू घेऊन ‘दुष्काळात सरकारने काय करायला हवे’, याविषयी सूचना केल्या. ‘कर्ज काढून सारा भरू नका’, असे त्यांनी शेतकर्‍यांना सांगितले. ‘फॅर्मिंन कोडा’चे मराठी भाषांतर करून स्वतः टिळक आणि त्यांचे सहकारी यांनी खेड्यापाड्यात जाऊन त्याविषयी माहिती सांगून पत्रके वाटली.

१०. लोकसेवा, सक्तमजुरीची शिक्षा आणि लोकप्रेम !

वर्ष १८९७ मध्ये प्लेगवरील सरकारच्या जुलमी उपायांमुळे लोक आणि सरकार यांच्यात भांडण जुंपले. त्या वेळी टिळकांनी लोकसेवा करून आणि स्वप्रयत्नाने खासगी ‘प्लेग हिंदू हॉस्पिटल’ उभे केले. टिळक प्रतिदिन या रुग्णालयाला भेट देत. वर्ष १८९७ मध्ये टिळकांवर झालेल्या खटल्यामुळे त्यांना १८ मासांची सक्तमजुरी भोगावी लागली. शेवटी पाश्‍चात्त्य पंडित मॅक्सम्यूलर प्रभृतींच्या मध्यस्थीने ६ मास अगोदर त्यांची सुटका झाली. त्यामुळे टिळकांबद्दल सर्व हिंदुस्थानभर सहानुभूती उत्पन्न झाली. त्यांच्यासाठी निधी (फंड) जमा झाला. मुंबईचे व्यापारी त्यांना तारण राहिले. कलकत्त्यास जमलेल्या वर्गणीने रवाना झालेल्या बॅरिस्टरांनी त्यांचा युक्तीवाद केला. सरकारला राजद्रोहाच्या कायद्याची भाषा दुरुस्त करावी लागून सरकारला सर्व जनतेकडून ‘अन्यायी आणि खुनशी’ म्हणवून घ्यावे लागले. अशा रीतीने या प्रकरणात नैतिक विजय टिळकांनाच लाभला.

११. विविध चळवळी

वर्ष १९०५ मध्ये कर्झनशाहीच्या जुलुमाने स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य इत्यादी चळवळी चालू झाल्या. याविषयी टिळकांनी मोठी कामगिरी केली.

१२. टिळकांवरील कामगारांचे प्रेम

वर्ष १९०८ च्या एप्रिलमध्ये बॉम्बच्या अत्याचारास बंगालमध्ये आरंभ होताच टिळकांवर सरकारने खटला भरला. त्यात टिळकांनी एखाद्या बॅरिस्टरप्रमाणे स्वतःच स्वतःचा युक्तीवाद केला. त्या वेळी न्यायालयाने टिळकांना ६ वर्षांची शिक्षा ठोठावल्यावर मुंबईच्या २८ गिरण्यांच्या ३५ सहस्र कामगारांनी टिळकांच्या ६ वर्षांच्या शिक्षेला धरून ६ दिवस गिरण्या बंद ठेवल्या. हा गिरणी कामगारांचा पहिला संप होता. टिळकांवर दिसून येणारे कामगारांचे प्रेम !

Read moreलोकमान्य टिळक : एक लोकोत्तर नेता !

श्रीकृष्णा, तुझ्याकडे येण्याची हूरहूर वाढते आहे ।

श्रीकृष्णा, तुझ्याकडे येण्याची हूरहूर वाढते आहे ।
तुझ्या दर्शनाने हरखून अन् बहरून जायचे आहे ॥ १ ॥


Multi Language |Offline reading | PDF