दैनिक सनातन प्रभातचा रंगीत प्रजासत्ताकदिन विशेषांक

प्रजासत्ताकदिन विशेषांक : विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ जानेवारीच्या दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

पुणे जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने

राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत हे भारताच्या राष्ट्रीय अस्मितेचे मानबिंदू ! त्यांचा योग्य तो मान राखला जावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ ही चळवळ राबवली जाते.

नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन

१५ जानेवारी २०२० या दिवशी नांदेड येथे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांना निवेदन देण्यात आले. तसेच नांदेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के आणि नांदेड येथील शिक्षणाधिकारी यांनाही राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याविषयी निवेदन देण्यात आले.

पुणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळेतील ५०० विद्यार्थ्यांचे प्रबोधन

येथील नांदेड गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक श्री. बागुल यांना निवेदन देण्यात आले. खडकवासला येथील यशवंत विद्यालयात २६ जानेवारीनिमित्त ‘राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा मान राखा’ याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री होत असल्यास तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन चालू करण्यासाठी प्रयत्न करू ! – डॉ. अनंत गव्हाणे, निवासी जिल्हाधिकारी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा याविषयीचे निवेदन येथील निवासी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना देण्यात आले. या वेळी त्यांनी सांगितले की, हिंदु जनजागृती समिती प्रत्येक वेळी अशा विषयावर सतर्क राहून कार्यरत असते, पुष्कळ चांगले उपक्रम हातात घेते

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणार्‍यांवर गुन्हे नोंद करा !

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, तसेच राज्यशासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कारवाई करावी आणि जे विक्रेते शासनाचा अध्यादेश डावलून प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करतात त्यांच्यावर गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा पोलीस अधीक्षक एम्. राजकुमार आणि उपजिल्हाधिकारी ललितकुमार वराडे यांच्याकडे ९ जानेवारीला निवेदनाद्वारे करण्यात आली.