सरसंघचालक मोहन भागवत यांनी राममंदिर विश्‍वस्त मंडळात जाऊ नये ! – चंपत राय, राष्ट्रीय उपाध्यक्ष, विहिंप

अयोध्या येथील राममंदिर उभारण्यासाठी सिद्ध केल्या जाणार्‍या विश्‍वस्त मंडळात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सहभागी होऊ नये, असे स्पष्ट मत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्र्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी ७ डिसेंबरला येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

रामजन्मभूमीवरील निकालाच्या विरोधात एकूण ५ पुनर्विचार याचिका

रामजन्मभूमी खटल्याच्या निकालाच्या विरोधात समयमर्यादा संपेपर्यंत एकूण ५ पुनर्विचार याचिका प्रविष्ट झाल्या आहेत. प्रथम जमीयत-उलेमा-ए-हिंदकडून ही याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर ६ डिसेंबरला आणखी ४ जणांनी ही याचिका प्रविष्ट केली.