(म्‍हणे) ‘स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍या ‘सहा सोनेरी पाने’ पुस्‍तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान !’ – प्रणिती शिंदे, आमदार, काँग्रेस

‘सहा सोनेरी पाने’ या पुस्‍तकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महिला यांचा अवमान करण्‍यात आला आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्‍या आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

‘इस्लाम धर्म’ हाच आपला खरा शत्रू आहे ! – पू. संभाजी भिडेगुरुजी

आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्वात नाहीत; पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रूपाने औरंगजेब अजूनही अस्तित्वात आहे.

विरोधक वा तज्ञ यांचा दु:स्वास करून नाही, तर प्रत्यक्ष कृतीचे विवेचन कोरोना थांबवायला साहाय्यक ठरेल ! – देवेंद्र फडणवीस

मागील वर्षभरापासून आम्ही रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजावून सांगण्याची, त्यांच्या साहाय्याला धावून जाण्याची आमची सिद्धता आहे. तुलना केवळ परिस्थितीशी नको, तर सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे.

राज्यातील ९० टक्के वाळू उत्खनन अवैध, जिल्हाधिकार्‍यांपासून मंत्रालयापर्यंत हप्ते चालू ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

गेली अनेक वर्षे अवैध वाळूउपसा होत आहे. यात अनेक वेळा तहसीलदार, माहिती अधिकार कार्यकर्ते आदींवर प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. अवैध वाळूउपसा चालू रहाण्यामागे भ्रष्टाचार हेच मोठे कारण आहे, हे सामान्य जनतेलाही माहीत आहे.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून सातारा येथील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ची पहाणी

महाराष्ट्राचे ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च आणि तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्ह्यातील ‘बोरगाव कृषी विज्ञान केंद्रा’ला भेट देऊन पहाणी केली. तसेच विविध उपक्रमांची माहिती घेऊन शेतकर्‍यांशी संवाद साधला.

सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील २५.५४ किलोमीटर रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नुकतेच सोलापूर-विजापूर राज्य मार्गावरील रस्त्याचे चौपदरीकरण करतांना २५.५४ किलोमीटर (एक पदरी) रस्ता केवळ १८ घंट्यांत पूर्ण केला आहे. ठेकेदार आस्थापनाच्या ५०० कर्मचार्‍यांनी यासाठी परिश्रम घेतले आहेत.

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !

मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

उद्योगपती अदानी शरद पवार यांच्याकडे येऊन गेल्यानंतर सरकारने वीज देयक माफ न करण्याचा निर्णय घेतला !

वीज देयक माफ न करण्याचा निर्णय वीज आस्थापनांसमवेत चर्चा झाल्याशिवाय झाला नसेल. काही तरी लेनदेन झाल्याशिवाय हे झाले नसेल. सर्व आस्थापनांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी केला.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी नियम पाळणे आवश्यक ! – उद्धव ठाकरे

राज्यात अनुमाने ३ लाख ५० सहस्र कोरोनाचे लसीकरण झाले आहे. ब्रिटन, ब्राझील या देशात ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग फैलावत आहे आणि मृत्यू होत आहेत, ते पहाता लोकांनी बेसावध न रहाता अधिक सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.