पाक स्वत:च मानवाधिकारांची पायमल्ली करत आहे ! – भारत

‘यूनेस्को’मध्ये पाकने अयोध्येच्या निकालाचे सूत्र उपस्थित करताच भारताने सुनावले खडेबोल ! येनकेन प्रकारेण भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्ती करणारा कावेबाज पाक ! पाकमध्ये अल्पसंख्य हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविषयीही आता भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने आवाज उठवायला हवा !

काश्मीरच्या सूत्रावरून भारताला पाठिंबा देणार्‍या ब्रिटीश महिला पत्रकाराशी धर्मांधांचे असभ्य वर्तन !

येथे पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या धर्मांधांनी २७ ऑक्टोबर या दिवशी म्हणजेच दिवाळीत भारतविरोधी मोर्च्याचे आयोजन केले होते. या वेळी मोर्च्याच्या ठिकाणी पोचलेल्या ब्रिटनच्या सुप्रसिद्ध महिला पत्रकार केटी हॉपकीन्स यांना धर्मांधांनी धक्काबुक्की केली.

युरोपीय युनियनचे प्रतिनिधीमंडळ आज करणार काश्मीरचा दौरा

या प्रतिनिधीमंडळामध्ये बेल्जियम, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंगडम, स्पेन, पोलंड, इटली आदी देशांचा समावेश आहे. आजवर भारताकडून कोणत्याही परदेशी शिष्टमंडळाला जम्मू-काश्मीरचा दौरा करण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. त्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.