करमाळा (जिल्हा सोलापूर) येथे तिरडी मोर्चा काढत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निषेध

उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टी.एम्.सी. पाणी उचलण्याच्या निर्णया विरोधात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात तिरडी मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

सांगलीत व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्ष यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !

या मोर्च्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी, भाजप आमदार सुधीर गाडगीळ, मिरज येथील भाजप आमदार  सुरेश खाडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे, ‘कॅट’चे उपाध्यक्ष अतुल शहा सहभागी झाले होते.

पाकमध्ये हिंदु मुलींच्या बळजोरीने होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवणार्‍या हिंदु पत्रकाराची हत्या !

पाकमधील असुरक्षित हिंदू ! भारतातील निधर्मीवादी पत्रकार या हत्येचा निषेध करणार का ? पाकमधील हिंदूंचे रक्षण तेथील सरकारने करावे, अशी मागणी ते करणार का ?

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून ‘गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र’ या मागणीसाठीचा धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्चा स्थगित !

गोवंश हत्या अन् लव्ह जिहाद मुक्त महाराष्ट्र यांसह अन्य मागण्यांसाठी २५ फेब्रुवारी या दिवशी धुळे ते आझाद मैदान (मुंबई) पदमोर्च्याचे आयोजन कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने राष्ट्र आणि समाज हित डोळ्यांसमोर ठेवून स्थगित करण्यात आला.

पी.एफ्.आय.कडून वर्ष १९२१ मध्ये मलाबार येथील हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ !

हिंदूबहुल देशात हिंदूंच्या नरसंहाराची शताब्दी ‘साजरी’ केली जाणे हे हिंदूंना लज्जास्पद ! यातून पुढेही हिंदूंचा नरसंहार होऊ शकतो, हेच पी.एफ्.आय.कडून दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आतातरी केंद्र सरकार पी.एफ्.आय.वर बंदी घालणार का ?

वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चा अयशस्वी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते; परंतु उपस्थितीअभावी हा मोर्चा रहित करण्यात आला. 

आमचे ऐकले नाही, तर देशभरात ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार ! – राकेश टिकैत यांची केंद्र सरकारला चेतावणी

आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही, तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात मोर्चा काढू.

न्यायालयीन चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाचा नकार

२६ जानेवारीच्या दिवशी देहलीत ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचाराचे अन्वेषण सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने करावे, अशी मागणी करणारी याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.

देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.

६ फेब्रुवारीला देशभर रस्ता बंद आंदोलन ! – किसान मोर्चाची घोषणा

असे बंदचे आयोजन करून जनतेला वेठीस धरणार्‍या संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई आवश्यक !