इन्सुली येथे अनधिकृतपणे वाळूची वाहतूक करणार्‍या ४ डंपरवर महसूल विभागाची कारवाई

मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे महसूल विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत अनधिकृरित्या वाळूची वाहतूक करणारे ४ डंपर कह्यात घेतले.

 नीरा नदीकाठावर गोवा राज्यातून आलेला मद्याचा ट्रक पकडला

गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करणार्‍या ट्रकवर नीरा नदीच्या काठी राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाने कारवाई केली.

तंत्रज्ञानाचा आधिक वापर करून रस्ते अपघातावर नियंत्रण मिळवणार ! – पोलीस आयुक्त, नवी मुंबई

३२ व्या रस्ता सुरक्षा अभियान निमित्ताने ‘एक पाऊल… अपघातमुक्त समाजाकडे’ या विषयावर नवी मुंबई पोलीस वाहतूक विभाग आणि नवी मुंबई प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने संवाद व्यवस्थेशी या उपक्रमांतर्गत वाशी येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस १ फेब्रुवारीपासून चालू ! – संजीव मित्तल

आम्ही कोरोनाकाळात श्रमिकांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध केली. त्यानंतर विशेष रेल्वे गाड्याही चालू केल्या आहेत. दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे गाड्या हळूहळू चालू करत आहोत. कोल्हापूर- वैभववाडी मार्गाचे काम येत्या वर्षभरात चालू करण्याचा प्रयत्न आहे.

महापालिकेच्या बेवारस वाहन जप्ती मोहिमेत आतापर्यंत ८१ वाहने जप्त

सांगली महापालिका क्षेत्रात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बेवारस वाहने पडून असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे