लैंगिक समस्यांवरील औषधांवर अमेरिकी सैन्य प्रतिवर्षी करते ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च !

अमेरिकी सैन्य सैनिकांना भेडसावणार्‍या लैंगिक समस्यांवर उपाय मिळण्यासाठी प्रतिवर्ष ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च करते. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार समर ली यांनी एका सैन्याधिकार्‍याला विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली.

ऑनलाईन खेळामुळे एका मुलाने गमावले मानसिक संतुलन !

विज्ञानाने केलेल्या प्रगतीचा लाभ घेतांना त्याचा अतिरेक केल्यावर काय होते, हेच या घटनेतून लक्षात येते ! यासाठी अशा प्रकारच्या गोष्टींचा वापर कुणी करावा आणि कुणी करू नये, असेही नियम असणे आवश्यक आहेत !

‘व्हिडिओ गेम’चे दुष्परिणाम जाणा !

विध्वंसक खेळ खेळणारी मुले खेळ खेळून झाल्यावर पुढच्या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्वंसक वागतात. विध्वंसक खेळ खेळणार्‍या मुलांमध्ये वाईट स्वप्ने पडून भीतीने थरथरत उठण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक असते.’

अमेरिकेतील किमान १२ टक्के मुलांना नैराश्य !

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीय हिंदूंनी लक्षात ठेवावे की, तेही त्यांच्या पाल्यांना नैराश्यग्रस्त करण्याच्या मार्गावरच नेत आहेत !

गरोदरपणामध्ये नैराश्यात असणार्‍या माता-पित्यांमुळे मुलांमध्येही होतो मानसिक आजार ! – ब्रिस्टल विश्‍वविद्यालयातील मानसोपचार तज्ञांचा अभ्यास

यावरून समाजातील प्रत्येक घटकाला साधना शिकवणे का आवश्यक आहे, हे लक्षात येते ! हिंदु संस्कृतीत गरोदर महिलेला धार्मिक ग्रंथांचे वाचन करणे, साधना करणे, आदी गोष्टी करण्यास सांगितल्या जातात. ते का आवश्यक असते, हे या अभ्यासावरून लक्षात येईल !

नियमित व्यायाम, योगासने आणि प्राणायाम केल्यास रोगप्रतिकारक क्षमता वाढते ! – डॉ. भूपेश शर्मा, वैद्यकीय तज्ञ, हरियाणा

तसेच जेवणामध्ये नियमित शुद्ध तूप आणि तेल यांचा समावेश करावा. यामुळे वायूतत्त्व संतुलनात राहून शरिरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित रहाते.                       

आत्महत्या !

तीव्र आणि घोर निराशा, हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण आहे. मनाच्या तात्कालिक अवस्थेवर विजय मिळवल्यासच आत्महत्या रोखली जाऊ शकते.

क्षुल्लक कारणावरून आत्महत्या करणारी तरुण मुले !

आत्महत्या करणार्‍यांमध्ये १५ ते ३० या वयोगटातील व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.  पौगंडावस्थेतील १.२ दशलक्ष मुलांकडून आत्महत्येचा प्रयत्न होतो, हेही वास्तव आहे.

मानसिक आधाराची आवश्यकता !

सध्या कोरोनामुळे समाजमन सैरभैर झाले आहे. कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांना मिळणार्‍या हीन वर्तणुकीमुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. तसेच कोरोना कक्षातून वा अलगीकरणातून पळून जाणे, आत्महत्या करणे आदी घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे.

कोविड महामारीमुळे लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये ७० टक्के वाढ ! – सुषमा मांद्रेकर, अध्यक्ष, गोवा बाल हक्क आयोग

कोरोना महामारीमुळे गेले कित्येक मास घरी बसून काढावे लागल्याने लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे. या कालावधीत मुलांच्या मानसिक आरोग्याच्या समस्येत ७० टक्के वाढ झाली असल्याची माहिती गोवा बाल हक्क आयोगाच्या अध्यक्ष सुषमा मांद्रेकर यांनी दिली.