११६ जणांचे कोरोनाविषयीचे अहवाल नकारात्मक !- जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णाच्या अतीजोखमीच्या संपर्कातील आणखी ८ व्यक्तींच्या घशातील स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. २६ मे या दिवशी पाठवलेल्या ५९ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. यापूर्वी पाठवलेले जिल्ह्यातील ११६ जणांचे अहवाल नकारात्मक आले आहेत.

थोडक्यात महत्त्वाचे…सिंधुदुर्ग वार्ता

सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना मास्क आणि सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ सावंतवाडी येथील पत्रकारांना साहित्य देऊन करण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह अन्य उमेदवारांनी घेतली आमदारकीची शपथ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांसह विधान परिषदेच्या ९ उमेदवारांनी १८ मे या दिवशी आमदारकीची शपथ घेतली. २१ मे या दिवशी विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार होते; मात्र अतिरिक्त उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक विनाविरोध पार पडली.