समाज सुसंस्कारित व्हावा !

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मद्य पिण्यासाठी उद्युक्त करणारा विज्ञापनाचा फ्लेक्स लावल्याच्या प्रकरणी पुणे येथील देवीप्रसाद शेट्टी या उपाहारगृह मालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. केवळ व्यवसायाची विक्री वाढावी; म्हणून तरुण पिढीला व्यसन लावणार्‍यांची नीतीमत्ता किती खालावली आहे, हे यातून अधोरेखित होते.

गुजरातमध्ये मद्यपान करणार्‍या भाजपच्या नेत्याला द्यावे लागले त्यागपत्र !

राजकीय नेत्यांकडूनच कायद्याचे पालन होत नसल्याने जनता कायदाद्रोही झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

मंदिरात मांस खाण्यावरून आणि मद्य पिण्यावरून पुजार्‍याची हत्या

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने कुणाला मंदिरात पुजारी ठेवावे, हेही ठाऊक नसल्याने आणि कायदा हातात घेऊ नये, हे ठाऊक असतांनाही अशा घटना घडतात !

दक्षिण आफ्रिकेच्या नाईट क्लबमध्ये सापडले २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह !

नाईट क्लबमध्ये २१ विद्यार्थ्यांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या परीक्षा संपल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी हे विद्यार्थी या क्लबमध्ये गेले होते.

९१ लाख रुपयांचा विदेशी मद्यसाठा शासनाधिन !

लाखो रुपयांचा मद्यसाठी सापडणे, हे सुरक्षायंत्रणेचे अपयश नव्हे का ?

पिंपरी (पुणे) येथे ६० लाखांचा विदेशी मद्याचा साठा जप्त !

मुंबई-बेंगळुरू महामार्गावर तळेगाव टोलनाका परिसरात उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून विदेशी मद्याचा मोठा साठा पकडला. हे मद्य गोवा राज्यात विक्रीसाठी नेले जात होते.

अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ यांच्यावर कारवाई करा ! – कळंगुटवासियांची मागणी

अशी मागणी जनतेला का करावी लागते ? अनधिकृत पब आणि ‘डान्स बार’ कुणाच्या संगनमताने चालतात ? संबंधितांवर कारवाई का होत नाही ?

पुरुष मद्यप्राशन करण्यामध्ये गोवा देशात पहिल्या स्थानावर ! – राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण

गोवा मुक्तीच्या ६० वर्षांनंतरही या स्थितीत जराही पालट झालेला नाही !

नाशिक येथे १४ लाखांचे विदेशी मद्य जप्त !

नाशिक येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोवा निर्मित तब्बल १४ लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि १० लाख रुपयांचे वाहन, असा एकूण २४ लाख रुपयांचा मुद्देमाल ९ मे या दिवशी जप्त केला आहे.

चंद्रपूर येथे मद्याच्या दुकानासमोर चहाविक्री करून स्थानिक नागरिकांकडून रोष व्यक्त !

मद्याचे दुकान चालू करण्यास महापालिकेचे अधिकारी दुकान मालकांना सहकार्य करत असतील, तर ही लज्जास्पद गोष्ट आहे. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना बडतर्फ केले पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.