न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण करणे आवश्यक ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

स्वातंत्र्यानंतर ७४ वर्षांनीही भारतीय न्यायव्यवस्थेचे भारतियीकरण न होणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद !

काबुलमध्ये बंदुकीचा धाक दाखवत भारतीय व्यावसायिकाचे अपहरण

तालिबानी राज्यात याहून वेगळे काय घडणार ? तालिबानचे समर्थन करणारे भारतातील तालिबानीप्रेमी आता याविषयी तोंड उघडतील का ?

स्विस बँक काळा पैसा असणार्‍या भारतीय खातेदारांची सूची तिसर्‍यांदा भारताला देणार

यापूर्वी देण्यात आलेल्या सूचीतून विशेष काही निष्पन्न झाले नव्हते. आताही तसेच होईल, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

काही दशकांपासून भारतात रहाणारे पाक आणि अफगाणिस्तान येथील शीख आणि हिंदु कुटुंबे भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत !

भारतात बांगलादेशी, रोहिंग्या आणि पाकिस्तानी घुसखोर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड सहज उपलब्ध होते; मात्र इस्लामी राष्ट्रांतून भारतात आलेले शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व कायद्यात सुधारणा होऊनही नागरिकत्व न मिळणे, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्जास्पद !

२० वर्षांत जे काही उभारले होते, ते सर्व संपले ! – अफगाणी खासदार नरेंदर सिंह खालसा

अफगाणिस्तानमधून भारतीय वायूदलाच्या विमानाद्वारे भारतीय आणि अफगाणी लोकांना भारतात आणले जात आहे. यांतील अफगाणिस्तानमधील शीख खासदार नरेंदर सिंह खालसा यांना भारतात आल्यावर अश्रू अनावर झाले.

अफगाणिस्तानहून भारतात यायला निघालेले १५० जण सुरक्षित !

येथून भारतात यायला निघालेल्या १५० जणांचे अपहरण करण्यात आल्याचे वृत्त प्रसारित झाले होते; मात्र स्थानिक अफगाणी प्रसारमाध्यमांनी स्पष्ट केले की, हे १५० जण सुरक्षित आहेत.

तालिबान्यांनी प्रथम दानिश सिद्दीकी यांना गोळी मारली आणि नंतर ते भारतीय असल्याच्या रागातून त्याचे डोके गाडीखाली चिरडले ! – अफगाणी कमांडरने दिली माहिती

तालिबानीही मुसलमान आणि भारतीय वृत्तछायाचित्रकारही मुसलमान असतांना तालिबान्यांनी केवळ तो भारतीय असल्याच्या रागातून त्याची हत्या केली, हे भारतातील मुसलमान लक्षात घेतील का ?

अतीशहाणे !

आपल्या अतीशहाण्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचा उदोउदो काही दिवस होऊन त्यांचा ‘ग्लॅमर’ इतिहासजमा होणार आहे, तर हिंदु राष्ट्र मात्र पुढील किमान १ सहस्र वर्षे टिकून जगाचे कल्याण करील, हे नासाच्या उदाहरणातून लक्षात घेऊन आपण ‘हिंदु’ भारतीय आश्वस्त होऊया !

देशाला समान नागरी कायद्याची आवश्यकता असल्याने केंद्रशासनाने प्रयत्न करावेत ! – देहली उच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयानेही यापूर्वी अशा प्रकारची सूचना केंद्रशासनाला केली आहे; मात्र त्यावर कोणत्याही पक्षाच्या शासनकर्त्यांनी प्रयत्न केलेले नाहीत. आता केंद्रातील भाजप शासन यासाठी प्रयत्न करील, अशी हिंदूंना अपेक्षा आहे !

जंक फूडमुळे आरोग्यावर होणार्‍या परिणामांविषयी ट्विटरवर झालेला #NoJunkFood_StayHealthy ट्रेंड तिसर्‍या क्रमांकावर !

नुकतेच ‘फायनॅन्शियल टाइम्स’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामध्ये जगातील खाद्यपदार्थ बनवणारे आस्थापन ‘नेस्ले’ने म्हटले आहे, ‘तिचे ६० टक्के खाद्यपदार्थ जंक फूड या श्रेणीमध्ये येतात आणि ते आरोग्यास चांगले नाहीत.’ आज जंकफूडच लोकप्रिय अन्न बनले आहे.