पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घाला ! – भाजपचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो

राष्ट्रापती स्वतःचे कर्तव्य म्हणून पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली पाहिजे, असे प्रतिपादन गायक तथा भाजपचे केंद्रीयमंत्री बाबुल सुप्रियो यांनी येथे केले.

छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही ! – आमदार राजेश क्षीरसागर

नगरमधील भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक समस्त हिंदू जणांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यांना भाजपमधून बडतर्फ करण्यात आले असून उपमहापौरपदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

मुसलमान समाजाशी संवाद साधण्यासाठी भाजप राज्यातील मुसलमानबहुल भागांत संवाद यात्रा काढणार

राज्यभरातील मुसलमान समाजाशी संवाद साधण्यासाठी ४ मार्चपासून राज्यातील मुसलमानबहुल भागांत भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्च्याच्या वतीने संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘नागालॅण्डमध्ये सत्तेवर आल्यास जेरुसलेमची विनामूल्य यात्रा घडवू !’ – भाजपचे ख्रिस्त्यांना आमीष

नागालॅण्डमध्ये आम्ही निवडून सत्तेवर आल्यास ज्येष्ठ ख्रिस्ती मतदारांना त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या जेरुसलेमची विनामूल्य यात्रा घडवू, असे आमीष भाजपने ख्रिस्ती मतदारांना दिले.

भाजपमध्ये सहभागी झालेल्या मुसलमान कुटुंबांना मशिदीत नमाजपठण करण्यास बंदी

शांतीबाजार येथे भाजपमध्ये सहभागी झालेल्या मुसलमान कुटुंबांना मशिदीत नमाजपठण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

(म्हणे) ‘भाजपला मत देऊ नका !’- नागालॅण्डमधील चर्चचे आवाहन

नागालॅण्डमधील सर्व चर्चची शिखर संघटना असलेल्या ‘नागालॅण्ड बाप्टिस्ट चर्च काऊन्सिल’ने (‘एन्.बी.सी.सी.’ने) केंद्र सरकारला जाहीर विरोध करत भाजपला मत न देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

हिंसाचाराला भाजप घाबरत नाही ! – अमित शहा यांची माकपला चेतावणी

येथील मतदारांना मतदानापासून रोखले जात असल्याचे आम्हाला समजले. मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकपला) सांगू इच्छितो की, या वेळी त्यांची लढत भाजपशी आहे.

रामकथेप्रमाणे विकासकामेही जनतेपर्यंत पोहोचवा ! – पंतप्रधान मोदी यांचा भाजपच्या खासदारांना संदेश

केंद्र सरकार राबवत असलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांना प्रेरित करण्यासाठी रामकथेचे उदाहारण दिले.

भाजपला राममंदिर बांधण्यासाठी निवडून दिले, तिहेरी तलाकचा कायदा करण्यासाठी नव्हे ! – डॉ. तोगाडिया

देशातील जनतेने अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी भाजपला निवडून दिले आहे, तिहेरी तलाकचा कायदा करायला नव्हे, असा घणाघात विश्‍व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी केला.