भाजपमध्ये गेलेल्या ३५० कार्यकर्त्यांवर गंगाजल शिंपडून त्यांना पुन्हा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश !

पक्षाशी एकनिष्ठ राहू न शकणारे नेते आणि कार्यकर्ते कधी राष्ट्राशी एकनिष्ठ रहातील का ? असे स्वाभिमानशून्य आणि तत्त्वहीन कार्यकर्ते असलेला पक्ष जनहित काय साधणार ?

६० वर्षीय वृद्धेवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास पोलिसांचा नकार

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेसह लोकांना न्यायही मिळत नाही, हे पहाता तेथे राष्ट्रपती राजवट लावणेच योग्य !

कोलकातामध्ये धर्मांधांकडून श्री महाकाली मातेच्या मंदिराची तोडफोड !

बंगालमध्ये हिंदुद्वेष्ट्या तृणमूल काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना आतातरी त्यांच्या चुकीची जाणीव होईल का ?

बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंची दैन्यावस्था !

स्वतंत्र भारताचा इतिहास आहे की, जेथे बहुसंख्य धर्मांध रहातात, तेथे प्रचंड प्रमाणावर हिंसाचार आणि जातीय दंगली घडवण्यात येतात. जेथे हिंदू अल्प प्रमाणात असतात, त्या प्रदेशांमध्ये भारताच्या सैन्यालाही नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी शक्ती व्यय करावी लागते.

तौक्ते पाठोपाठ आता ‘यास’ नावाचे चक्रीवादळ धडकणार !

कोरोना, तसेच एका पाठोपाठ एक येणारी चक्रीवादळे अशा घटना आपत्काळाचेच द्योतक आहे. आपत्काळात तरून जाण्यासाठी साधना करणेच आवश्यक आहे, हे आता तरी लक्षात घ्या !

संपूर्ण भारतीय जनता पक्ष बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. या हिंसाचारात ज्या कार्यकर्त्यांची घरे लुटण्यात आली, व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले, ज्यांच्या नोकर्‍या गेल्या, अशा सर्वांना पुन्हा उभे करण्याचे काम भारतीय जनता पक्ष निश्‍चितच करणार आहे, असे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.

सातारा येथे भाजप कार्यकर्त्यांची निदर्शने

पश्‍चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. महिलांवर सामुहिक बलात्कार करून त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अशा गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.

मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !

भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.

बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा विजय झाल्यानंतर काही ठिकाणी भाजपच्या कार्यालयांवर आक्रमणे करण्यात आली. एका ठिकाणच्या कार्यालयाला आगही लावण्यात आली, तर एका उमेदवारावर दगडफेक करण्यात आली. भाजपने याविषयी कारवाईची मागणी केली आहे.