वर्षभरात राज्यात अप्रमाणित बियाणांची विक्री करून शेतकर्‍यांची फसवणूक केल्याच्या ३३१ तक्रारी !

वर्ष २०१७ -१८ या वर्षभरात शेतकर्‍यांना अप्रमाणित बियाणांची विक्री करून त्यांची फसवणूक केल्याच्या प्रकरणी न्यायालयात ३०२, तर पोलीस ठाण्यात २९ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

साखर कारखान्याच्या बनावट समभागांची विक्री करून शेतकर्‍यांना फसवणार्‍यास ३ वर्षे सक्तमजुरी

कराड (जिल्हा सातारा) येथील जयवंत शुगर्सचा मी कर्मचारी आहे. मला समभाग विक्रीचे (शेअर्सचे) अधिकार आहेत, असे सांगून शेतकर्‍यांना फसवणार्‍या नवनाथ केसरकर याला वडूज येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. झाटे यांनी तीन वर्ष सक्तमजुरी आणि ३० सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली

सातारा येथे ‘रॉयल ट्विंकल स्टार क्लब’कडून लक्षावधी रुपयांची फसवणूक

रॉयल ट्विंकल स्टार क्लब प्रा. लि. या गुंतवणूकदार अस्थापनाने शहरासह जिल्ह्यातील अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी २० तक्रारदारांनी तक्रारी नोंदवल्या असून १३ लक्ष ५५ सहस्र रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करत तन्वी सेठ आणि त्यांच्या पतीचे पारपत्र संमत झाल्याचा संशय

पारपत्र कार्यालयात तन्वी सेठ उपाख्य सादिया अनस आणि त्यांचे पती यांचे पारपत्र त्यांनी सादर केलेला पत्ता कागदोपत्री सिद्ध न झाल्याने रहित करण्यात आले होते.

तन्वी सेठ आणि त्यांच्या पतीचे पारपत्र अखेर रहित अन् ५ सहस्र रुपयांचा दंड

येथील पारपत्र कार्यालयाने तन्वी सेठ उपाख्य सादिया अनस आणि त्यांचे पती महंमद अनस सिद्दीकी यांचे पारपत्र अखेर रहित केले आहे. तन्वी सेठ यांनी लक्ष्मणपुरी येथील दिलेल्या पत्त्यावर त्या रहात असल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा ……

बुरख्याआडील खोटारडेपणा !

अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी या देशात काय-काय केले जाईल, याचा नेम नाही.

शिरीष कुलकर्णी यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

डी.एस्. कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी यांचा अटकपूर्व जामीन फेटाळत सर्वोच्च न्यायालयाने त्यांना ८ दिवसांत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे उपस्थित रहाण्यास सांगितले होते. त्यानुसार शिरीष कुलकर्णी २५ जूनला आयुक्तालयात उपस्थित झाले.

जे एका आस्थापनाला कळते, ते भाजप सरकारला का कळत नाही ? कि कळूनही सरकार मुद्दाम दुर्लक्ष करते ?

४ पैकी १ भारतीय ग्राहक ऑनलाईन खरेदीमध्ये फसवला जातो, अशी माहिती एक्सपेरियन या जागतिक आर्थिक माहिती आस्थापनाने सिद्ध केलेल्या अहवालात देण्यात आली आहे.

विजय मल्ल्या यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाकडून आरोपपत्र प्रविष्ट !

उद्योगपती विजय मल्ल्या यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३ सहस्र ७०० कोटी रुपये ‘फॉर्म्युला १ कार रेसिंग कंपनी’, ‘टी-२० आयपीएल् संघ’ आणि खासगी विमानातून चैनीसाठी प्रवास, अशा गोष्टींवर उधळले असल्याचा उल्लेख अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात ‘प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँडरिंग अ‍ॅक्ट’अंतर्गत प्रविष्ट केलेल्या नव्या आरोपपत्रात केला आहे.

राज्यातील ६ सहस्र ७४२ रुग्णालये आणि नर्सिंग होम अनधिकृत, ८१ रुग्णालयांमध्ये बोगस आधुनिक वैद्यांकडून उपचार

न्यायालयाच्या आदेशावरून सरकारने विशेष मोहीम हाती घेऊन वर्षभरात राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, संभाजीनगर, लातूर, अकोला, नागपूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिक्षेत्रांतील ३७ सहस्र ६८ रुग्णालये अन् नर्सिंग होम यांची पडताळणी केली.


Multi Language |Offline reading | PDF