काळ्या पैशाची माहिती देण्यास केंद्रातील भाजप सरकारचा नकार

वर्ष २०१४ च्या निवडणुकीत परदेशातील काळा पैसा भारतात आणू असे जनतेला दिलेल्या आश्‍वासनाला भाजपने गेल्या ५ वर्षांत हरताळच फासलेला असतांना आता जो काही पैसा आणला आहे, त्याचीही माहिती देण्यास नकार देऊन भाजप लोकांना अंधारातच ठेवत आहे !

विटा येथे घडी घालताच पाचशेच्या नोटांचे तुकडे पडले

पाचशे रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील विटा येथे घडला आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनिल राठोड यांनी विट्यातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’चे शाखा व्यवस्थापक श्री. महेश दळवी यांना प्रात्यक्षिक दाखवले.

अमेरिकेत ७ भारतीय आस्थापनांवर खटले

जेनेरिक औषधांचे मूल्य संगनमत करून वाढवल्यामुळे ७ भारतीय आस्थापनांसह जगातील अनेक बलाढ्य औषधी आस्थापनांवर अमेरिकेतील ४४ राज्यांनी खटले प्रविष्ट केले आहेत.

उपाहारगृहे आणि लहान ढाब्यांना अल्प दरात गाढवाचे मांस विकणार्‍या आंध्रप्रदेशमधील ५ जणांना अटक

आजूबाजूला भटकणार्‍या गाढवांची हत्या करून त्यांचे मांस उपाहारगृहे आणि लहान ढाब्यांना अल्प दरात विकणार्‍या आंध्रप्रदेशमधील ५ जणांना पंढरपूर पोलिसांनी अटक केली.

आतंकवादी संघटनांना साहाय्य केल्याच्या कारणावरून पाककडून ११ संघटनांवर बंदी

पाक केवळ जगाला दाखवण्यासाठी अशी बंदी घालण्याचा दिखाऊपणा करत आहे. पाकला खरेच आतंकवाद नष्ट करायचा असता, तर त्याने प्रथम आतंकवाद्यांना प्रशिक्षण देणे बंद केले असते आणि सर्व आतंकवाद्यांना फाशी दिली असती !

आरोग्य सर्वेक्षणासाठी आल्याचे खोटे सांगून महागडी आयुर्वेदीय औषधे विकणार्‍यांपासून सावध रहा !

दैनिक सनातन प्रभातचे वाचक, सनातन संस्थेचे साधक आणि हितचिंतक यांना सूचना

(म्हणे) ‘घड्याळाचे मत कमळाला गेल्याचे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले आहे !’ – शरद पवार

अस्तित्वात नसलेला हिंदु आतंकवादही शरद पवार यांना ‘दिसला’ होता. वर्ष १९९३ मध्ये मुंबईमध्ये १२ बॉम्बस्फोट झालेले असतांना मुसलमानबहुल भागात (न घडलेला) १३ वा बॉम्बस्फोट झाल्याचे त्यांना ‘समजले’ होते; मात्र . . . यावरून आता त्यांच्या या विधानावर जनता कितपत विश्वास ठेवील ?

पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून त्यांना चीनमध्ये नेऊन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍या चिनी नागरिकांना अटक

पाकिस्तानी तरुणींशी बनावट विवाह करून नंतर त्यांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडण्यात येणार्‍या एका टोळीचा शोध लागला आहे. या तरुणींशी विवाह करून त्यांना खोटे सांगून चीनमध्ये नेण्यात येत होते… या घटनेतून असे स्पष्ट होते की, पाक आता पूर्णपणे चीनच्या कह्यात गेला आहे !

काँग्रेसी मंत्री नवज्योतसिंह सिद्धू पर महिला ने चप्पल फेंकी !

जनता गुस्से में है, आगे कुछ और फेंका गया तो आश्‍चर्य न होगा !

पुढे जनतेने कायदा हातात घेतला, तर आश्‍चर्य वाटू नये !

हरियाणातील रोहतक येथे पंजाबच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांच्यावर प्रचारसभेमध्ये एका महिलेने चप्पल भिरकावली; मात्र ती सिद्धू यांना लागली नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now