शरद पवार यांची संस्कृती (?) विश्‍वासघाताचीच ! – डॉ. शालिनीताई पाटील, माजी महसूलमंत्री

महाराष्ट्राचा कथित स्वाभिमान असणारे शरद पवार यांनी सत्तेच्या लालसेपोटी अक्षरश: लोटांगण घातले आहे. त्यांच्या स्वाभिमानाची व्याख्या एकदा पडताळून पाहिली पाहिजे.

पाकिस्तानला जाणारे पाणी रोखून हरियाणाकडे वळवणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पाकची प्रत्येक बाजूने कोंडी करणे आवश्यक असून त्या दृष्टीने असे निर्णय घेणे आवश्यकच आहे !

कामगार न्यून करण्याच्या वल्गना करणार्‍या पार्लेचा निवळ नफा १५ टक्क्यांनी वाढला

आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण करण्यासाठी कामगार न्यून करण्याच्या घोषणा दिल्या होत्या, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

महिलेची फसवणूक आणि बलात्कार करणार्‍या आधुनिक वैद्याला अटक

जोगेश्‍वरी (पूर्व) येथील एका २७ वर्षीय महिला रुग्णाची फसवणूक आणि बलात्कार करून तिची अश्‍लील चित्रफीत बनवून ती प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणार्‍या वंशराज दिवेदी या ५८ वर्षीय आधुनिक वैद्याला अटक करण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोकसी याचा आणखी एका बँकेत कर्जघोटाळा

पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोकसी याने ‘पंजाब अ‍ॅन्ड सिंध’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून ४४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.

शेतकर्‍यांची ६३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा न देता मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या आस्थापनाचे अनुज्ञप्तीपत्र कायमस्वरूपी रहित केले पाहिजे. तसेच आस्थापनाच्या संचालकांकडून फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांची रक्कम वसूल करायला हवी !

पुण्यात ८१ सहस्र ७५० रुपयांची ५४५ किलो भेसळयुक्त बर्फी जप्त

नागरिकांना भेसळयुक्त बर्फी देणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करून फसवणूक केल्याप्रकरणी भेसळीचे पैसेही वसूल करावेत !

इम्रान खान यांच्याकडून कुर्द मुसलमानांवरील तुर्कस्थानाच्या आक्रमणाचे समर्थन

काश्मीरमधील मुसलमानांवर भारताकडून कथित अत्याचार होत असल्याचा आरोप करणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांचे ढोंगी मुसलमानप्रेम उघड !

रुग्ण आणि त्यांंचे नातेवाईक यांचे औषधांच्या दुकानदारांकडून होणारे आर्थिक शोषण !

वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या अनेक अपप्रवृत्तींना वैध मार्गाने रोखण्यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संघटित होणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कटू अनुभव, तसेच आपल्या परिसरात अनुचित घटना घडत असल्यास त्याविषयी ‘आरोग्य साहाय्य समिती’ला त्वरित कळवा.

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ केले नाही ! – काँग्रेसचे ज्योतीरादित्य सिंधिया

मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास १० दिवसांत २ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफी करू’, असे आश्‍वासन काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी दिले होते; पण शेतकर्‍यांचे कर्ज पूर्णपणे माफ केलेले नसून केवळ ५० सहस्र रुपयांपर्यंतचेच कर्ज माफ केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF