पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांकडून २ महिलांवर बलात्कार !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी भागातील शेतवस्तीमध्ये ३ मासांपासून मध्यप्रदेशातील एक कुटुंब रहाण्यास आले होते. यात ३ पुरुष आणि ४ महिला आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री ७-८ दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आक्रमण केले. दरोडेखोरांनी तेथील पुरुषांचे हात-पाय बांधून ठेवत २ महिलांवर बलात्कार केला.