(म्हणे) ‘गोरक्षण आणि धर्म यांच्या नावाखाली झुंडबळीच्या वाढत्या घटना देशासाठी चिंताजनक !’ – आदी गोदरेज, उद्योगपती

गोदरेज यांना जिहादी आतंकवाद, धर्मांधांकडून होणार्‍या गोहत्या, हिंदूंना ‘काफिर’ ठरवून केल्या जाणार्‍या हिंसक कारवाया, ‘लव्ह जिहाद’ करून हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, देवतांच्या मूर्तींची तोडफोड करणे आदी घटना देशासाठी चिंताजनक वाटत नाहीत का ?

कबीर कला मंचचे लोक मोकाट राहिले, तर ते तरुणांना फूस लावतील !

नक्षल कमांडर बनलेल्या पुण्यातील बेपत्ता युवकाच्या कुटुंबियांची साधार भीती : केवळ ‘कबीर कला मंच’ नाही, तर पुरोगामी म्हणवणार्‍या अनेक संघटनांच्या माध्यमातून आज नक्षली विचारांना कधी उघड, तर कधी छुपे समर्थन दिले जात आहे.

अमर्त्य सेन यांनी अर्थशास्त्राकडेच लक्ष द्यावे !

‘रामराजा तला’ आणि ‘सेरामपोर’ हे बंगालमध्येच आहेत कि अन्य कुठे आहेत ? भूत-प्रेत यांच्यापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी आपण ‘राम राम’ असा जप करत नाही का ? अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रामुळे नोबेल पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या विषयाकडेच लक्ष द्यावे. – मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय

माओवादी आक्रमणप्रकरणी शहरी नक्षलवादी वरवरा राव पोलिसांच्या कह्यात

नक्षलवाद्यांनी आतापर्यंत १२ सहस्र निष्पाप नागरिक, तसेच पोलीस अन् प्रशासकीय नागरिक यांच्या हत्या केल्या आहेत; पण या प्रकरणी पुरोगामी टोळीने सोयीस्कर मौन बाळगले आहे. एरव्ही स्वातंत्र्य अन् लोकशाही संकटात आल्याची आरोळी देणारे पुरोगामी शहरी नक्षलवाद्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यांविषयी गप्प का ?

(म्हणे) ‘सावरकर हे सर्वांत मोठे फॅसिस्ट !’ – भालचंद्र मुणगेकर

गेल्या ५ वर्षांत जी सत्ता आली आणि त्यानंतर जी काही संस्कृती आणि उग्रवाद आला, तो फॅसिस्ट विचारधारेचा आहे. सावरकर हे सर्वांत मोठे फॅसिस्ट होते, असे प्रतिपादन मुंबई विद्यापिठाचे माजी कुलगुरु भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

बंगालमधील बुद्धीवादी हे भित्रे आणि सरकारकडून लाभ मिळवणारे ! – भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची टीका

बंगाल हिंसाचाराने धुमसत आहे. तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे गुंड राज्यात हिंसाचार करत असतांना समाजातील बुद्धीवादी मूग गिळून गप्प आहेत.

विमानतळाचा प्रश्‍न डॉ. भारत पाटणकर यांनी रखडवत ठेवला ! – बाधित शेतकरी

डॉ. भारत पाटणकर यांच्या कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी वारूंजी, केसे, मुंढे या गावांतील लोकांना वेठीस धरले आहे. मुद्दामहून मोजणी करत मापे टाकली आहेत.

युवकांनो, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्थानासाठी धर्मशिक्षण घ्या !

सध्या नाटक, चित्रपट, वृत्तपत्रे यांमधून हिंदु धर्म, संस्कृती, परंपरा, देवता, धर्मपुरुष यांचे विडंबन (विनोद), तसेच टीका केली जाते. गेल्या ७ दशकांत निधर्मीवादाचा उदोउदो होऊन ‘हिंदु’ म्हणजे बुरसटलेले, जुनाट असे वातावरण निर्माण करण्यात आले. दुसरीकडे हिंदूंचे धर्मशिक्षण बंद करण्यात आले.

प्रा. कलबुर्गी हत्येप्रकरणी बेळगावातून एकास अटक

प्रा. एम्.एम्. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने (एस्आयटीने) बेळगावातून प्रवीण चतुर यांना अटक केली आहे. त्यांना ७ जूनपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

(म्हणे) ‘सनातन संस्थेच्या सूत्रधारांना पकडा !’ – श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष

सनातन संस्था ही घटनाविरोधी संस्था असल्याचे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. संजीव पुनाळेकर हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे अधिवक्ता आहेत. त्यांनी आरोपींना सोडवण्याच्या निमित्ताने अनेक प्रकारे गुन्हे दाबण्याच्या दृष्टीने कायद्याचा गैरवापर केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF