१० वीची परीक्षा जूनमध्ये, तर १२ वीची परीक्षा मेच्या शेवटी घेणार !

विद्यार्थ्यांचे आरोग्य ही महाविकास आघाडीची प्राथमिकता आहे.

११ एप्रिल या दिवशी होणार असलेली एम्पीएस्सीची परीक्षा पुढे ढकलली !

वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एम्पीएस्सीची परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे ढकलली .

विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली दिलगिरी !

एम्.पी.एस्.सी. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाला. एम्.पी.एस्.सी. हे प्रकरण व्यवस्थित हाताळायला हवे होते, त्यामध्ये एम्.पी.एस्.सी. कुठेतरी कमी पडली, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे केले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एम्.पी.एस्.सी.) परीक्षा २१ मार्च या दिवशी होणार असल्याचे आयोगाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे घोषित केले आहे. यापूर्वी १४ मार्च या दिवशी होणारी ही परीक्षा रहित करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला होता.

सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेचा पेपर फुटला !

सैन्य भरतीसाठी घेण्यात येणार्‍या लेखी परीक्षेची प्रश्‍नपत्रिका फोडून तरुणांची आर्थिक फसवणूक करणार्‍या दोघांना सैन्याच्या गुप्तचर विभागाच्या साहाय्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कह्यात घेतले आहे.

१० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा निर्णय नाही !

मुंबई – इयत्ता १० वी आणि १२ वी च्या परीक्षा रहित करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच परीक्षेविना विद्यार्थ्यांना उत्तीर्णही करता येणार नाही. सामाजिक माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या खोट्या आहेत, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.

नागपूर येथे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्रतिबंधात्मक नियम पाळण्याचे आवाहन

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. परिणामी सुरक्षिततेच्या कारणास्तव इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी दिली.

सनातनची साधिका कु. प्रणिता दिवटे लेखापरीक्षक (ग्रुप १) परीक्षेत उत्तीर्ण

या यशाविषयी कु. प्रणिता म्हणाली, ‘‘अभ्यास करतांना नामजप, तसेच अत्तर-कापूर यांचे उपाय नियमित केले. याच समवेत नियमित प्रार्थनाही करते. केवळ ईश्‍वरी कृपा आणि गुरुदेवांचा आशीर्वाद यांमुळे हे शक्य झाले.’’

सनातनची साधिका कु. नकुशा नाईक ‘बी.एस्.सी. नर्सिंग’च्या द्वितीय वर्षात कर्नाटक राज्यात प्रथम !

शिक्षण घेतांना आणि परीक्षेपूर्वी अभ्यास करतांना कु. नकुशा हिने परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचे स्मरण करणे, आध्यात्मिक उपाय करणे, नामजपाची ध्वनीफीत लावणे आदी प्रयत्न केले.

केंद्र सरकार गायीच्या उपयुक्ततेची माहिती देण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणार !

गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे.