मथुरा येथील कथावाचक सुमेधा नंदजी महाराज यांना हिंदी भाषेतील सनातन पंचांग भेट

राधा नगरातील श्री राधेश्‍वर महादेव मंदिराच्या वार्षिक महोत्सवाच्या वेळी संत समागमास उपस्थित राहिलेले वृंदावन येथील कथावाचक श्री सुमेधा नंदजी महाराज यांची सनातनचे साधक श्री. राजीव भाटिया आणि साधिका विमल धमीजा यांनी भेट घेतली.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. सागर चोपदार आणि श्री. सतीश सोनार यांनी विविध आमदारांना ‘सनातन पंचांग २०२१’ भेट दिले.

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप हे अत्युत्तम अ‍ॅप  ! – कन्नड अभिनेते जग्गेश

अभिनेते जग्गेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘आपली संस्कृती, देवता, गुरु, आचार्य, सनातन धर्म, नक्षत्र, सणवार यांविषयी अत्युत्तम माहिती या अ‍ॅपमध्ये मिळते. याच्या साहाय्याने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाने आपले शुद्ध आचरण विसरलेल्यांना अभिमानाने आपलेपणाची जाणीव होते.’’

भारतीय अर्थव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था हिंदु पंचांगावर अवलंबून असल्याने पंचांगाचे महत्त्व ‘यावच्चंद्रदिवाकरौ’ राहील ! – पंचागकर्ते मोहन दाते

हिंदूंची कालगणना लाखो वर्षे जुनी असून ती सूर्य-चंद्र यांच्या गतीवर आधारित आहे. तशीच ती निसर्गचक्र आणि ऋतूचक्र यांना अनुकूल आहे. त्यामुळे प्रतिवर्षी सण, ऋतू, व्रते आदी दिवस पालटत नाही;

महामंडलेश्‍वर स्वामी डॉ. मुकुंददास महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२१ – हिंदी’चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आणि संकेतस्थळ यांचे प्रकाशन

तिथी, दिनांक, दिनविशेष यांसारखे वैशिष्ट्यपूर्ण ‘विजेट’सह हे ‘अ‍ॅप’ ‘गूगल प्ले’च्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेे. या पंचांगामध्ये वर्ष २०२० च्या मासांचीही माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे जानेवारीची प्रतीक्षा न करता आताही हे पंचांग ‘डाऊनलोड’ करता येऊ शकते.

आली वर्ष २०२१ च्या ‘सनातन पंचांगा’ची सुवार्ता, मन आनंदी झाले आता ।

हे केवळ पंचांग नसे, तर हे असे हिंदुत्वाचे सर्वांग । करूनी नेत्रांच्या भावज्योती करू त्याची पंचारती ।
सेवेची सुवर्णसंधी मिळाल्याने कृतज्ञता व्यक्त करू गुरुचरणी ॥

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.