शेवगाव (नगर) दंगलीतील जिहादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी ! – विश्व हिंदु परिषद

दंगल घडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली, त्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी आणि या घटनेमागचा सूत्रधार कोण आहे ? याचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन नगर जिल्हा विश्व हिंदु परिषदेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.

महाराष्‍ट्रातून मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली बेपत्ता !

१८ ते २५ वर्षे वयोगटांतील तरुणी बेपत्ता होण्‍याचे राज्‍यातील प्रमाण धक्‍कादायक आहे. मार्चमध्‍ये २ सहस्र २०० मुली म्‍हणजे प्रतिदिन सरासरी ७० मुली बेपत्ता झाल्‍या आहेत.

अवैध वाळूउपसा केल्‍यास थेट ‘मकोका’ लागणार ! – महसूलमंत्री विखे पाटील

वाळूच्‍या अवैध वाहतुकीस आणि तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.

एकाही हिंदु व्‍यापार्‍यावर आक्रमण झाले, तर जशास तसे उत्तर देऊ ! – भाजपचे आमदार नितेश राणे यांची चेतावणी

नगर येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर झालेल्‍या आक्रमणाचे प्रकरण. येथे जिहाद्यांनी केलेले अतिक्रमण आणि त्‍यांची दादागिरी पुष्‍कळ वाढलेली आहे. त्‍यामुळे येथील हिंदु व्‍यापार्‍यांवर मुख्‍य बाजारपेठ सोडून जाण्‍याची वेळ आलेली आहे

नगर येथे धर्मांधांनी व्यापार्‍यांवर केलेल्या आक्रमणाच्या निषेधार्थ व्यापार्‍यांचे ठिय्या आंदोलन

येथे दुकानासमोर बॅरिकेड लावण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका गटाकडून २ व्यापार्‍यांवर चाकूने आक्रमण करण्यात आले. या घटनेमुळे आक्रमक झालेल्या व्यापार्‍यांनी १५ एप्रिल या दिवशी बाजारपेठ बंद ठेवली. कापड बाजारपेठेत ठिय्या आंदोलन करण्यात आले.

साईबाबा आणि शनि शिंगणापूर मंदिरातील ध्वनीवर्धकावरील आरती बंद !

जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षांनुवर्षे चालू असलेली रात्रीची शेजारती, तसेच पहाटेची काकड आरतीही ध्वनीवर्धकावरून बंद करण्यात आली. शनी शिंगणापूर देवस्थाननेही ध्वनीवर्धकावरील काकड आरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

मराठवाडा येथे ५ मुले नदीत बुडाली, चौघांचा मृत्यू !

जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वानेगाव येथे ६ ऑक्टोबर या दिवशी आजीसमवेत गिरजा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली तिघे मुले बुडाली आहेत.