जीवनात आनंद मिळण्यासाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रत्येक मनुष्याची धडपड, ही आनंद मिळावा म्हणून असते. हा आनंद केवळ साधनेनेच मिळू शकतो. साधना केल्याने जीवनात कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते; म्हणून प्रत्येक मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी केले.

आनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक ! – सद्गुरु नंदकुमार जाधव

आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे. आपले ध्येय काय असायला हवे ? किडामुंगीपासून प्रगत मानव प्राण्यापर्यंत प्रत्येक जण सुख कसे मिळेल ? यासाठीच धडपडत असतो; पण सुख कसे मिळवायचे ?, हे शाळा, महाविद्यालय यांमध्ये शिकवले जात नाही. आनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते.


Multi Language |Offline reading | PDF