‘तांडव’ वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी !

‘तांडव’ या वेबसिरीजमध्येे कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांचा अवमान आणि विटंबना केली आहे. या वेबसिरीजवर तात्काळ बंदी घालावी, या मागणीचे निवेदन येथील जिल्हाधिकारी कार्यालय येथे देण्यात आले.

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, या व्रताचे स्वत: पालन करून इतर धर्मप्रेमींकडूनही ते करवून घेणारे ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते !

‘धर्माचे पाळण । करणें पाषांड (पाखंड) खंडण ॥’, म्हणजे ‘धर्मद्रोही विचारांचे खंडण हेसुद्धा धर्मरक्षणच !’, हे व्रत त्यांनी घेतले होते. त्यांनी आयुष्यभर त्याचे पालन केले आणि इतर धर्मप्रेमींकडूनही करवून घेतले.

सोलापूर येथे नववर्षाच्या शुभेच्छा गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन करणारा फलक !

शास्त्रीनगर भागातील धर्मप्रेमी युवकांनी पाश्‍चात्त्य परंपरा मोडीत काढून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा निर्धार केला. त्यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला देण्याचे आवाहन केले.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ऑनलाईन व्याख्याने, प्रशासनाला निवेदन देणे आदी माध्यमांतून ३१ डिसेंबरच्या विरोधात चळवळ

नववर्ष १ जानेवारीऐवजी गुढीपाडव्याला साजरे करण्याच्या संदर्भात पूर्व आणि पूर्वोत्तर भारतातील राज्यांत हिंदु जनजागृती समितीद्वारे ‘ऑनलाईन’ बैठकांचे आयोजन !

‘सनातन पंचांग’ अ‍ॅप हे अत्युत्तम अ‍ॅप  ! – कन्नड अभिनेते जग्गेश

अभिनेते जग्गेश यांनी ट्वीटमध्ये म्हटले, ‘‘आपली संस्कृती, देवता, गुरु, आचार्य, सनातन धर्म, नक्षत्र, सणवार यांविषयी अत्युत्तम माहिती या अ‍ॅपमध्ये मिळते. याच्या साहाय्याने पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणाने आपले शुद्ध आचरण विसरलेल्यांना अभिमानाने आपलेपणाची जाणीव होते.’’