संसदेजवळ महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या तरुणीला देहली पोलिसांनी केली मारहाण !

देशात महिलांवरील अत्याचार वाढले असल्याच्या निषेधार्थ अनु दुबे या तरुणीने संसदेच्या प्रवेशद्वार क्रमांक २ आणि ३ जवळच्या पदपथावर ठिय्या आंदोलन केले. त्या वेळी तिने हातात ‘व्हाय आय कान्ट फील सेफ इन माय ओन भारत’ असे लिहिलेला फलक धरला होता.