आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष न्यायालयाचा दणका

वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक तथा आतंकवादी डॉ. झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष पीएम्एल्ए न्यायालयाने ‘३१ जुलैपूर्वी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित व्हा अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल’, अशी चेतावणी १९ जून या दिवशी दिली.

(म्हणे) ‘न्याय मिळण्याची शक्यता नसल्याने डॉ. झाकीर नाईक याला भारताकडे सोपवणार नाही !’ – मलेशियाचे पंतप्रधान

डॉ. झाकीर नाईक याला भारतात न्याय मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण केले जाणार नाही, असे विधान मलेशियाचे पंतप्रधान महाथीर महंमद यांनी केले आहे.

नोकरी-धंदा नसतांनाही राष्ट्रद्रोही झाकीर नाईक याच्या अधिकोषांच्या खात्यांत ४९ कोटी २० लाख रुपये ! – अंमलबजावणी संचालनालयाची माहिती

अधिकोषात इतकी रक्कम जमेपर्यंत आयकर विभाग आणि गुप्तचर यंत्रणा झोपल्या होत्या का ? त्यांना याचा सुगावा कसा लागला नाही ? त्यामुळेच नाईकसारख्या देशद्रोह्यांना गुन्हे करण्यास मोकळीक मिळाली !

जिहादी आतंकवादाचे समर्थक डॉ. झाकीर नाईक यांच्या संघटनेवर बंदी; मग त्यांच्या फेसबूक खात्यावर का नाही ? – हिंदु जनजागृती समिती

डॉ. झाकीर हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे जर भारत सरकारचे म्हणणे आहे, तर त्यांच्या स्वतःच्या आणि त्यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संघटनेच्या फेसबूक खात्यांवर सरकारने आजही बंदी का घातली नाही ? त्यांच्या संघटनेवर घातलेली बंदी ही दिखाऊपणाच म्हणावा लागेल !

राष्ट्रद्रोही झाकीर नाईकविरोधात युवावर्गाची दिशाभूल करून त्यांना आतंकवादी कारवायांसाठी उत्तेजन देण्याचा आरोप !

गुन्हे करून आरोपी पसार झाल्यावर त्यांच्यावर गुन्हे नोंदवून हतबलता दर्शवणारे नव्हे, तर गुन्हा करण्याचे कोणाचे धैर्यच होणार नाही, असा धाक निर्माण करणारे शासनकर्ते आणि पोलीस मिळण्यासाठी हिंदु (ईश्‍वरी) राष्ट्राविना पर्याय नाही !

श्रीलंकेत डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘पीस टीव्ही’ वाहिनीवर बंदी

एका जिहादी आतंकवादी आक्रमण झाल्यावर त्याच्या विरोधात तातडीने निर्णय घेणार्‍या श्रीलंकेकडून ३ दशके निष्क्रीयता आणि कणाहीनता दाखवणारे भारतीय शासनकर्ते शिकतील तो सुदिन !

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवणार्‍या आत्मघाती आतंकवाद्यावर डॉ. झाकीर नाईक यांचा प्रभाव

हिंदुद्वेषी आणि जिहादी डॉ. झाकीर नाईक केवळ भारतासाठी नव्हे, तर जगासाठी धोकादायक आहेत. मलेशियात लपून बसलेले डॉ. झाकीर नाईक यांना भारतात आणून त्यांना शिक्षा करण्याचे धारिष्ट्य भाजप सरकार दाखवील का ?

मुंबई येथे हिंदुद्वेष्टा झाकीर नाईक याच्या साथीदाराला अटक !

इस्लामी प्रचारक आणि हिंदु धर्म अन् देवता यांच्याविषयी अपप्रचार करणारा हिंदुद्वेषी झाकीर नाईक याचा साथीदार अब्दुल कादीर नजमुद्दीन साथक याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएम्एल्ए) येथे अटक केली.

डॉ. झाकीर नाईक यांना भारताकडे सोपवणार नाही ! – मलेशियाचे पंतप्रधान

डॉ. झाकीर नाईक यांना मलेशिया भारताकडे सोपवणार नाही. त्यांना आम्ही मलेशियाचे नागरिकत्व दिले आहे, असे मलेशियाचे पंतप्रधान महातीर बिन महंमद यांनी म्हटले आहे.

भारतात परतण्याचे वृत्त निराधार ! – झाकीर नाईक

जिहादी आतंकवाद्यांचे मार्गदर्शक आणि त्यांचे आदर्श असणारे राष्ट्रद्रोही झाकीर नाईक यांना मलेशिया सरकार भारताकडे सोपवणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झालेले असतांनाच झाकीर यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now