अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधातील २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही !

केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे नोंद असून तिला एकामध्ये जामीन संमत झाला; परंतु ‘तिच्याविरोधातील अन्य गुन्ह्यांत आम्ही तिला अटक करणार नाही’, असे सरकारी अधिवक्त्या अरुणा पै यांनी सांगितले.

डोंबिवली येथे भोंदूबाबाकडून विकासकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक !

मानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

शिवसेना आणि शिवसैनिक यांना ‘महाविकास आघाडी’च्या विळख्यातून सोडवण्यासाठीच माझा लढा ! – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथून पहिले त्यागपत्र

कल्याण आणि नवी मुंबई येथे ए.टी.एम्. यंत्रे फोडल्याचे प्रकार; दोघांना अटक, ७ जण पसार

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि नवी मुंबई येथील खारघर हद्दीमध्ये अधिकोषांची ए.टी.एम् यंत्रे फोडून फरार झालेल्या ९ जणांच्या टोळीतील सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.

ठाणे येथे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे शक्तीप्रदर्शन

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या समर्थनार्थ ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी फलक (बॅनर) लावले असतांनाच, त्यापाठोपाठ २५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात ३० जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश !

या काळात नागरिकांना एकत्र येऊन सार्वजनिकरित्या घोषणा देणे, सुरक्षितता धोक्यात येईल, अशा प्रकारची भाषणे करणे या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) तालुक्यातील कुशिवली धरण भूसंपादनात झाला कोट्यवधींचा घोटाळा !

प्रस्तावित कुशिवली धरणाच्या भूसंपादनात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात आतापर्यंत ४३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवसेनेच्या अंबरनाथ पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती प्रवीण भोईर यांनाही अटक करण्यात आली आहे.

भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांच्या वतीने महाराणा प्रताप जयंती साजरी !

भिवंडी येथे हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र येऊन महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी असणारे धर्मप्रेमी श्री. दीपक गुप्ता आणि श्री. चंद्रशेखर यांनी प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत ३८ अनधिकृत शाळा !

इतक्या संख्येत अनधिकृत शाळा उभारल्या जाईपर्यंत शिक्षण विभाग काय करत होता ? विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणाऱ्या संबंधितांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

कल्याण येथील अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद जोशी यांचे निधन !

अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.