ठाणे येथे संरक्षकभिंती कोसळल्या !

पावसामुळे ठाणे शहरात काही भागांत वृक्ष उन्मळून पडले. घोडबंदर रस्त्यावरील काजूपाडा येथे दुचाकी खड्ड्यात गेल्यामुळे तोल जाऊन एस्.टी. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

कन्हैयालाल यांच्या हत्येचा निषेध करत कल्याण येथे आंदोलन !

उदयपूर येथे कन्हैयालाल यांची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करत ३ जुलै या दिवशी कल्याण येथील हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलन केले.

मुख्यमंत्र्यांचे ठाणे नगरीत जोरदार स्वागत !

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे ४ जुलै या दिवशी प्रथमच ठाणे येथे आले. ठाणे येथील समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच ठाणे जिल्ह्याला ‘मुख्यमंत्रीपद’ मिळाल्याने ठाणेकरांनी आनंद व्यक्त केला.

डोंबिवली येथे विकासकाला फसवणार्‍या भोंदूबाबाला अटक !

कोट्यवधी रुपयांचा पैशाचा पाऊस पडेल, या आमिषाला बळी पाडून डोंबिवली पूर्वेकडील चोळे गावातील बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांची ५६ लाख रुपयांची रक्कम घेऊन भोंदूबाबासह ५ भामटे पसार झाले होते.

ठाणे येथे संरक्षक भिंत कोसळून एक जण घायाळ !

पडलेल्या भिंतीचा मलबा रस्त्याच्या एका बाजूला केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे. घायाळ झालेल्या अन्य व्यक्तींवर उपचार चालू आहेत.

अभिनेत्री केतकी चितळे हिच्या विरोधातील २१ गुन्ह्यांमध्ये तिला अटक करणार नाही !

केतकीविरोधात एकूण २२ गुन्हे नोंद असून तिला एकामध्ये जामीन संमत झाला; परंतु ‘तिच्याविरोधातील अन्य गुन्ह्यांत आम्ही तिला अटक करणार नाही’, असे सरकारी अधिवक्त्या अरुणा पै यांनी सांगितले.

डोंबिवली येथे भोंदूबाबाकडून विकासकाची ५६ लाख रुपयांची फसवणूक !

मानपाडा पोलीस ठाण्यात भोंदूबाबासह ५ भामट्यांवर विविध कलमांनुसार गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

शिवसेना आणि शिवसैनिक यांना ‘महाविकास आघाडी’च्या विळख्यातून सोडवण्यासाठीच माझा लढा ! – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथून पहिले त्यागपत्र

कल्याण आणि नवी मुंबई येथे ए.टी.एम्. यंत्रे फोडल्याचे प्रकार; दोघांना अटक, ७ जण पसार

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी आणि नवी मुंबई येथील खारघर हद्दीमध्ये अधिकोषांची ए.टी.एम् यंत्रे फोडून फरार झालेल्या ९ जणांच्या टोळीतील सरफुद्दीन रईस खान, उमेशकुमार प्रजापती या कुख्यात गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे.